सेलोटीच्या सरपंचांनी पूर्ण केले लसीकरणाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:07+5:302021-05-09T04:37:07+5:30
जिल्ह्यात ग्रामीण भागात एकीकडे लसीकरणाबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे अनेक जण ज्येष्ठ नागरिक व महिला लसीकरण करण्यास टाळत ...

सेलोटीच्या सरपंचांनी पूर्ण केले लसीकरणाचे उद्दिष्ट
जिल्ह्यात ग्रामीण भागात एकीकडे लसीकरणाबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे अनेक जण ज्येष्ठ नागरिक व महिला लसीकरण करण्यास टाळत आहेत. अशा वेळी घराघरात जाऊन लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम सेलोटी येथे करण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शिबिरात ८० व्यक्तींनी लसीकरण केले. ६ मे रोजी सेलोटी येथे आयोजित शिबिरात १०० लोकांनी लसीकरण केले. लसीचा साठा संपल्याने ३५ व्यक्तींना सरपंच निखाडे यांनी लाखनीला स्वतःच्या वाहनाने पाठविण्याची व्यवस्था करून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले.
खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी निखाडे यांचे कौतुक केले.
लसीकरणाचे पूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सेलोटीचे सरपंच देवनाथ निखाडे, ग्रामसेवक अजय राऊत, उपसरपंच भूपेंद्र गेडाम, सदस्य सतीश लांडगे, तुकाराम पाखमोडे, नरेश नेवारे, शोभा हटवार, कल्पना निखाडे, प्रतिमा गिऱ्हेपुंजे, माधुरी लांजेवार, शिपाई हंसराज हलमारे, रवींद्र हलमारे, उमेश डोंगरवार, आरोग्यसेविका बी.एम .भुते, आरोग्यसेवक एम.बी. खरवडे, आशासेविका दुर्गा खराबे, मीना कांबळे, वंदना मिरासे, अंगणवाडी सेविका सत्यभामा पाखमोडे, कविता निखाडे, अनुरता गिऱ्हेपुंजे यांनी घरोघरी भेट देऊन कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृती केली आहे.