‘तो’ ट्रॅक्टरचालक फरारच
By Admin | Updated: April 14, 2015 00:59 IST2015-04-14T00:59:46+5:302015-04-14T00:59:46+5:30
तीन दिवसांपूर्वी झालेल्या ट्रॅक्टर अपघातातील ट्रॅक्टर चालक अजूनही फरार आहे. या ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात

‘तो’ ट्रॅक्टरचालक फरारच
घटनेला झाले तीन दिवस : वऱ्हाडी झाले होते जखमी
साकोली : तीन दिवसांपूर्वी झालेल्या ट्रॅक्टर अपघातातील ट्रॅक्टर चालक अजूनही फरार आहे. या ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले नसून ज्या वाहनाने हा अपघात घडला तो ट्रॅक्टर नवीन असून त्यावर नंबरही नाही. घटनेला तीन दिवस लोटले तरी ट्रॅक्टर अजूनपर्यंत पोलीस ठाण्यात आणलेले नाही.
दि. १० एप्रिल रोजी वऱ्हाड्यांना घेऊन परत विहिरगाव बुराड्या येथे येत असताना बोळदे व सोनका या गावाच्या मधात रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला होता. या अपघातात ५० वऱ्हाडी जखमी झाले होते. या अपघातातील १४ जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडउमरी येथे तर १६ जखमी वऱ्हाड्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.ज्या ट्रॅक्टरनी हा अपघात झाला त्या ट्रॅक्टरला नंबर नसून पोलिसांनी हा ट्रॅक्टर पोलीस ठाणे येथे न आणता बोळदे येथे पोलीस पाटलाच्या घरी ठेवला आहे. साकोली परिसरात दरवर्षी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात होतात. तशी नोंदही पोलीस ठाण्यात होत असते. दरवर्षी लग्नाच्या धामधुमीत दररोज ट्रॅक्टरने वऱ्हाड्यांची ने-आण होत असते. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वाहतुकीचे तीनतेरा
साकोली हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या मार्गावर दररोज वर्दळ असते. आता लग्नसराईच्या काळात ग्रामीण भागातील वऱ्हाड्यांना नेण्यासाठी कमी खर्चाचे ट्रक्टर उपयोगात आणले जाते. या ट्रक्टरमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असतानाही वाहतूक पोलीस केवळ अर्थार्जन करीत आहेत.