शेतीत राबून मिळविली ‘त्याने’ रेल्वेत नोकरी

By Admin | Updated: August 4, 2015 00:27 IST2015-08-04T00:27:43+5:302015-08-04T00:27:43+5:30

मेहनत करण्याची तयारी अन् जिद्द असेल तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करता येते. हे दाखवून देण्याची क्षमता आता ग्रामीण तरुणांमध्येही आहे.

He got a job in the railways | शेतीत राबून मिळविली ‘त्याने’ रेल्वेत नोकरी

शेतीत राबून मिळविली ‘त्याने’ रेल्वेत नोकरी

लोकमत शुभवर्तमान
परिस्थितीवर मात करणारा महेंद्र ठरला ग्रामीण मुलांसाठी प्रेरणा

राजू बांते मोहाडी
मेहनत करण्याची तयारी अन् जिद्द असेल तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करता येते. हे दाखवून देण्याची क्षमता आता ग्रामीण तरुणांमध्येही आहे. याचं उदाहरण म्हणजे बेटाळा येथील महेंद्र मधुकर राऊत. या तरुणाने आई वडीलांसह शेतीत राबून मोठ्या जिद्दीने केंद्र शासनाच्या रेल्वे विभागात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविली आहे.
ग्रामीण विभागात गुणवत्तेची कमी नाही. मेहनत करणारी बेरोजगार तरुण मंडळी आहेत. पण, केवळ मार्गदर्शनाअभावी ही तरुण मंडळी मागे पडत आहेत. मनात स्वन अन् ते साध्य करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल तर उद्दिष्टांपर्यंत पोहचता येते हे बेटाळा या खेड्यातील महेंद्रने दाखवून दिले. नोकरीत वशिला चालतो. त्याशिवाय नोकरीच मिळू शकत नाही. ही समज त्याने खोटी ठरविली.
स्पर्धा परीक्षेतून एक रुपया व वशिला न देताही नोकरी प्राप्त करता येते हे महेंद्रने दाखवून दिले आहे. अठराविश्व दारिद्र्य, शेतीत राबणारी आई व वडील. त्यांना मदत म्हणून स्वत:ही शेतीत काम करायचे ही दिनक्रमा चालून असायचं.
शिक्षण गावच्याच जिल्हा परिषदेत झाले. मॅट्रीकही गावच्याच खासगी शाळेतून केली. शिक्षण घेण्याची जिद्द म्हणून महेंद्र तालुक्याच्या शाळेतून बारावी पास झाला. नाही मिळेल भीक तर मास्तरकी शिक. या उक्तीप्रमाणे महेंद्रने बारावीनंतर डी.एड.ची परीक्षा पास केली. शिक्षक भरतीची दारे शासनाने बंद केली. त्यामुळे महेंद्रने डी.एड. करून बेरोजगारीत वाढ केली असे उपहासाने म्हटले जायचे. पण त्याच्या मनात नोकरी मिळविण्यासाठी धडपड सुरुच होती. वर्तमानपत्रात येणारी शासकीय जाहिरातीकडे त्याचा लक्ष होता. अर्हतेनुसार महेंद्र स्पर्धा परीक्षेत इथवर होता.
यश अपयश पाठीशी यायचे. पण या महेंद्रने हिंमत हारली नाही. नेहमीप्रमाणे त्याने रेल्वे विभागातची ट्रयाकमेल या पदाची परीक्षा दिली. यात तो यशस्वी झाला. त्याला नोकरीत रूजू होण्यासंबंधी पत्र आला. मागील जुलै २०१५ महिन्यात तो रेल्वे विभागात तारसा या ठिकाणी रूजू झाला आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याने शेतीतही कामे केली. आज त्या काळ्या आईने त्याच्या मेहनतीची चीज केली. महेंद्र राऊतने मिळविलेल्या जिद्दीमुळे, प्रयत्नामुळे जे यश मिळाले त्यांची प्रेरणा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच मिळणार आहे.

Web Title: He got a job in the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.