‘तो’ मातीला देत आहे देवत्वाचा आकार
By Admin | Updated: August 27, 2014 23:19 IST2014-08-27T23:19:22+5:302014-08-27T23:19:22+5:30
एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते फक्त एका संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला

‘तो’ मातीला देत आहे देवत्वाचा आकार
इंद्रपाल कटकवार - भंडारा
एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते फक्त एका संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला त्यांच्या हातात होती. मातीपासून विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती ते सहज करीत. याबाबत त्यांच्या परंपरागत वारसा अविरतपणे जोपासणारे त्यांचे नातू व मूर्तिकार सुरेश माधवराव रुद्राक्षवार यांनी या कलेबाबत अनेक रहस्य उलगडले.
भगवंताने ज्या मातीत मनुष्याला जन्म दिला त्या मातीतून भगवंतांची प्रतिमा साकारण्याचे अहोभाग्य एका कलावंत कुटुंबियाला लाभले आहे. गांधी चौक परिसराला लागून असलेल्या छोट्याशा जागेत रुद्राक्षवार कुटुंबिय गत १०$४ वर्षांपासून देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याचा वारसा अखंडपणे जोपासत आहे.
याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली असता सुरेश म्हणाले, आजोबांपासून मिळालेला हा वारसा आधी वडिलांनी व नंतर आम्ही दोघे भावंड जोपासत आहोत. माझे वडील माधवराव रुद्राक्षवार यांच्याकडून मातीला विविध कलात्मक आकार देण्याचे धडे गिरविले. लहानपणापासून मातीची प्रचंड ओढ असल्यामुळे पारंपरिक कला शिकायला फार वेळ लागला नाही.