शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या नुकसानभरपाईसाठी 'त्याने' रचला वाघाच्या हल्ल्याचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:51 IST

Bhandara : डॉक्टरांनी १४ इंजेक्शन देऊ म्हणताच सत्य आले पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सकाळी शेतात मोहाची फुले वेचत असताना, आपल्यापुढे चक्क वाघ आला. त्याने हल्ला करून जखमी केल्याने बेशुद्ध झालो, असे सांगत 'तो' वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयात भरतीही झाला. मात्र, रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगताच नुकसानभरपाई म्हणून मिळणारी रक्कम लाटण्यासाठी त्याने रचलेला बनाव उघड झाला.

वाघाचा हल्ला झाल्याचा बनात रचणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव दुधराम राजीराम मेश्राम (वय ४१) असे असून, तो साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील रहिवासी आहे. रविवारी सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलो असता, आपल्यावर वाघाने हल्ला केल्याचा बनाव त्याने रचला. बेशुद्ध पडल्यावर शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी घरी आणल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, तो जखमी झाल्याचे कळल्याने वनरक्षक रामेश्वर भराडे यांनी त्या शेतकऱ्याला दवाखान्यात नेले. काही वेळात वनविभागाची चमूही रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांना आणि वनविभागाच्या पथकालाही त्याने हीच कहाणी सांगितली. मात्र, त्याच्या पोटावरील जखमा पाहून सर्वांनाच शंका आली. 

अखेर सत्य वदवून घेण्यासाठी डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी युक्ती केली, वाघाच्या नखांचे विष होऊ नये, म्हणून पोटात रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावेच लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले. ते ऐकताच दुद्धरामची चळबळ वाढली. मेलो तरी चालेल, पण इंजेक्शन घेणार नाही, असे सांगून त्याने स्पष्ट नकार दिला. दुधराम खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने शहानिशा करण्यासाठी त्याला शेतावरील कथित घटनास्थळी नेले गेले. मात्र, त्या मोहाच्या झाडाला फुलेच नव्हती. वाघ नेमका कुठे होता, तो कसा दिसला, किती अंतरावर होता, अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर, आपण बेशुद्ध असल्याने काहीच आठवत नाही, अशी दिशाभूल त्याने केली.

वनविभागाच्या चमूने परिसराची पाहणी केली असता, वाघाचे पगमार्कही कुठेच आढळून आले नाहीत. अखेर त्याचा खोटेपणा लक्षात आल्यावर त्याला गावात परत आणण्यात आले.

म्हणे, मी झुडपात पडलो...मला वाघ दिसला, पण त्याने मला जखमी केले नाही. मी झुडपात पडलो, असा जबाब दुधरामने दिला आहे. तथापि, वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुधरामने दाखविलेल्या घटनास्थळी कुठलीही झुडपे आढळली नाहीत. सहायक वनरक्षक संजय मेंढे यांच्याकडे विचारणा केली असता, चर्चेत येण्यासाठी किंवा वाधाने हल्ला केल्याचे सांगितल्यास पैसे मिळतील, या लालसेपायी त्याने असा बनाव केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. तो झाडावरून पडला असावा किंवा एखाद्या झुडपात पडल्याने काटे ओरबाडले असावे, असा अंदाज वनरक्षक कुंभरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :bhandara-acभंडाराTigerवाघCrime Newsगुन्हेगारी