पालावरच्या शाळेत जिल्हाधिकारी झाले शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:46+5:302021-04-03T04:31:46+5:30

संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शनिवारी साकोलीला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा येथे पोहोचला. शिस्तीत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचापूस करातना ...

He became the Collector of Palawar School | पालावरच्या शाळेत जिल्हाधिकारी झाले शिक्षक

पालावरच्या शाळेत जिल्हाधिकारी झाले शिक्षक

संवेदनशील मनाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शनिवारी साकोलीला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा येथे पोहोचला. शिस्तीत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचापूस करातना त्यांच्यातील शिक्षक जागा झाला. हात खडू पकडून त्यांनी विद्यार्थ्यांना धडा देणे सुरू केले. खुद्द जिल्हाधिकारी शिकवत असल्याचे चित्र पाहून उपस्थित अचंबित झाले. भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश व विमुक्त भटक्या जाती बेलदार समाजाच्या संयुक्त विद्यमाने पालावरची शाळेचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व चमूने भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण वालकर, तहसीलदार रमेश कुंभरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर व शासकीय चमू निरीक्षणास आली होती. यावेळी अर्जुन सोनकुसरे, पदाधिकारी दिलीप चित्रीव, सुजित, श्रीकांत, राजेंद्र, महेंद्र, राहुल आवरकर, वस्ती प्रमुख घनश्याम बोकडे, तिलक सोनकुसरे, आकाश बोकडे, शिवा बोकडे, मनिष बोकडे, रोशन बोकडे, सिमल बोकडे, शिक्षक रश्मी बोकडे, भारत सोनकुसरे, मुन्ना लोखंडे, दिनेश बोकडे, कमल बोकडे व सर्व बेलदार समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: He became the Collector of Palawar School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.