शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

‘तो’ वृद्ध शासनाच्या आधाराला मुकला

By admin | Updated: January 11, 2015 22:45 IST

एक नव्हे चारदा त्या वृध्दाने शासकीय आधारासाठी अर्ज केला. पण, प्रशासनातील स्वार्थी व्यक्तींमुळे ते अर्ज समितीपर्यंत पोहचलेच नाही. आज एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण निस्तारले.

राजू बांते - मोहाडीएक नव्हे चारदा त्या वृध्दाने शासकीय आधारासाठी अर्ज केला. पण, प्रशासनातील स्वार्थी व्यक्तींमुळे ते अर्ज समितीपर्यंत पोहचलेच नाही. आज एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण निस्तारले. मात्र तो पर्यंत या वृद्धाने जगाचा निरोप घेतला.ही कथा नसून एका निराधार वृद्धाची व्यथा आहे. प्रशासन वृध्दांना कसे अव्हेरते. त्याचा नमुना मोहगाव देवी येथे दिसून आला. मोहगाव देवी येथे वास्तव्यास असलेला तो ८५ वर्षीय वृध्द. त्यांचे नाव ढोमणू पडोळे या वृध्दाने श्रावण बाळ योजनेसाठी चारदा अर्ज केले होते. ते अर्ज सगळे तत्कालीन तहसीलदार विजय बोरुडे यांच्या काळात दिले गेले होते. यात संजय गांधी निराधार योजनेतील काही सदस्य, प्रशासनातील कर्मचारी व काही बाहेरचे एजंटांचा समावेश होता. त्यामुळे ७७ वर्षीय ढोमणू गणपत पडोळे या वृध्दाचा आधारासाठी थारा लागला नाही. दरम्यान एका सामाजिक कार्यकत्याची त्या वृध्दाची २०१४ ला भेट झाली. त्या वृध्दाचा अर्ज भरला. सरळ संजय गांधी निराधार योजनाच्या बैठकित तहसिलदारांसमोर मांडला. अखेर तो अर्ज मंजूर झाला. २७ जून २०१४ ला ६०० रुपये प्रथम प्राप्त झाले. त्याच्या पुढच्या २ जुलै २०१४ ला अतिवृष्टीचे पैसे जमा झाले. नंतर पुन्हा २७ जुलैला संजय गांधी निराधार योजनेचे १२०० रुपये जमा झाले. ढोमणू पडोळे हे त्या आधाराची प्रतिक्षा करीत खाटेवर खिळून पडले. आधाराची पेंन्शन व अतिवृष्टीची सहायता निधीची स्वत: उचल करु शकला नाही. १२ वर्षापूर्वीपासून संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीला प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या निराधार योजनेपासून वंचित राहावे लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर म्हणजे ७६ वर्षी या योजनेचा लाभ मिळाला. पण त्याच्या हक्काची शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन प्राप्त करुन घेण्यासाठी वृध्द झालेला ढोमणू पडोळे हे सक्षम नव्हते. अखेर आज सकाळी ९ वाजता त्या वृध्दाने अखेरचा निरोप घेतला. प्रशासनाचे कर्मचारी गावा- गावात असताना अशा अनेक वृध्दांना शासनाकडून मिळणाऱ्या निराधार योजनेच्या निधीसाठी तहसिलमध्ये पायपीट करावी लागते. बऱ्याच वृध्दांना या योजनेपासून दूर राहावे लागते. आज घडीला तत्कालीन तहसलिदारांनी मंजूर केलेले प्रकरणाची पून्हा तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी तपासणी सुरु केले आहे. दोन वर्षाचे प्रकरण अंतिम मंजूरीसाठी पडून आहेत. अशा वृध्दाची वाताहत होताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला दिसत नाही.