शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करुन त्याने गाठले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:11 IST

बसस्थानक परिसरात गॅस शेगडी दुरूस्तीचे छोटेसे दुकान थाटून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा गाडा चालविणासह शिक्षण पूर्ण करीत सुरेशने समाजशास्त्र विषयात पहिला क्रमांक पटकावित चार सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

ठळक मुद्देलोकमत शुभ वर्तमान : चार सुवर्णपदकांनी सुरेशला गौरविले

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : बसस्थानक परिसरात गॅस शेगडी दुरूस्तीचे छोटेसे दुकान थाटून मिळेल त्या पैशात कुटुंबाचा गाडा चालविणासह शिक्षण पूर्ण करीत सुरेशने समाजशास्त्र विषयात पहिला क्रमांक पटकावित चार सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. यात त्याने गरिबीवर मात करून शिक्षण कसे पूर्ण करायचे यासाठी स्वत:चा नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.अत्यंत गरीब घराण्यातील सुरेश देशपांडे याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या एम.ए.समाजशास्त्र विषयात सी.जी.पी.ए. श्रेणीत १० पैकी ९.५० घेऊन विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला आहे. कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह, रेशीम बाग नागपुर येथे नुकताच संपन्न झालेल्या १०४ वा दिक्षांत समारंभात या विद्याथ्यार्ला चार सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले आहे. सुरेश हा सध्या लाखांदूर येथे गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करीत आहे. सुरेश मुळचा गोंदिया जिल्ह्यातील इसापूर या गावातील आहे. गॅस शेगडी दुरुस्ती करून अभ्यासक्रम पूर्ण करुन अत्यंत कष्टाने त्यांनी ही पदविका मिळवली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना शिक्षण पूर्ण करू शकत नसल्याने सुरेशने मनात काही तरी करुन दाखविण्याचा निश्चय केला. लाखांदुर येथील बस स्थानकावर गॅस शेगडी दुरुस्ती दुकान चालू केली. या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाºया मोबदल्यातुन पुढील शिक्षण चालू ठेवले होते. सुरेशला सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्यांने या यशासाठी आपल्या गुरुजनांचे व सहकारी मित्राचे आभार मानले. कारण इसापूर येथुन लाखांदुरला आल्यानंतर हिंमत न हरता त्यांने मित्र परिवाराच्या मदतीनं विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका मिळवली.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरेशचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आपण जिवनात यशस्वी होऊन आपल्या प्रमाणे समाजातील इतर विध्यार्थी घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर गरिबीतून कस मार्ग काढता येत यावर पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहीत्य मंच लाखांदुरच्या वतीने सुरेशचा सत्कार करण्यात आला असून, यावेळी नगरसेवक हरीष बगमारे, दिनेश कुडेगावे, पं.स.सदस्य शिवाजी देशकर, निलेश बगमारे, आदित्य बगमारे, लीलाधर ढोरे आदी उपस्थित होते.