Hazardous traffic on the National Highway under electric wires | राष्ट्रीय महामार्गावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांखालून धोकादायक वाहतूक

राष्ट्रीय महामार्गावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांखालून धोकादायक वाहतूक

ठळक मुद्देट्रकांना धोका : बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी-देव्हाडी शिवारात वीज तारा लोंबकळत आहे. मालवाहू ट्रकमधील साहित्यांचा संपर्क वीज तारांशी येत आहे. सध्या सदर महामार्ग धोकादायक ठरत आहे. रस्त्यांची उंची वाढल्याने लोंबकळणाºया तारांचा संपर्क मालवाहतूक ट्रकशी येत आहे. येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे एका बाजूचे काम झाले आहे. सिमेंट रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे मालवाहू ट्रकमधील सामानाचा संपर्क लोंबकळणाºया तारांशी येत आहे. यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता अधिक आहे. वीज वितरण कंपनीने लोंबकळणाºया तारांची उंची वाढविण्याची मागणी माजी जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर सिमेंट रस्ता बांधकामाला येथे सुरूवात झाली. एकेरी रस्ता बांधकाम माडगी शिवारात पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.
बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीने येथे दखल घेण्याची गरज आहे. जड वाहतुकीचे मालवाहतूक ट्रक सदर रस्त्यावरून धावतात. अनेकदा त्यात अधिक साहित्य असते. त्यामुळे ट्रक चालकाला लोंबकळणाºया तारांचा अंदाज येत नाही.
रात्रीला येथे दुर्घटनेची शक्यता अधिक आहे. मागील दीड महिन्यापासून मालवाहतूक ट्रकांचा धोकादायक प्रवास येथून सुरू आहे.
सदर मार्गावर महावितरण कंपनीचे सब स्टेशन आहे. येथे दररोज अधिकाऱ्यांचे ये-जा असते. परंतु लोंबकळणाºया तारा या वीज वितरण कंपनीच्या असल्याने त्याकडे कुणी लक्ष देत नाही, असे समजते. सामूहिक जवाबदारीच्या तत्वाने तशी माहिती देणे येथे गरजेचे आहे.

 

Web Title: Hazardous traffic on the National Highway under electric wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.