आंतरराज्यीय मार्गावरील वाहतूक धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:51+5:30

भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहे. सध्या सदर दुभाजक रात्री वाहनचालकांना दिसत नाही.

Hazardous traffic on interstate lanes | आंतरराज्यीय मार्गावरील वाहतूक धोकादायक स्थितीत

आंतरराज्यीय मार्गावरील वाहतूक धोकादायक स्थितीत

ठळक मुद्देदुभाजक तुटले : बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील रस्त्यावरील तुटलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत आहे. सदर रस्ता शहराचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. आंतरराज्यीय महामार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. गत दीड ते दोन वर्षांपासून या मार्गावर अनेक समस्या वाहनधारकांना भेडसावत आहे. तीन ते चार ठिकाणी मार्गावरील दुभाजक तुटलेल्या धोकादायक स्थितीत असून रात्री वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहे. सध्या सदर दुभाजक रात्री वाहनचालकांना दिसत नाही. किमान दुभाजक दुरुस्ती करुन रिफलेक्टर लावण्याची नितांत गरज असताना रस्त्याची देखभाल व नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
तुमसर शहरातून सदर आंतरराज्यीय मार्ग कटंगी बालाघाट येथे जातो. २४ तास या रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. भरधाव वेगाने वाहने येथून जात असतात. त्यामुळे येथील दुभाजक वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरतो आहे. या मार्गाने वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे नित्याचेच आवागमन होत असतांनाही त्यांचेही सदर रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरुपी येथे सुरक्षीततेच्या उपाययोजनेची गरज आहे. १५ वर्षापूर्वी सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शहरातून जाणारा हा रस्ता वाहतूकीसाठी अरुंद ठरत असून येथे अनेकदा लहान मोठे अपघात घडले आहेत. रस्त्यावर दुभाजक नसल्याने वाहनधारक जीव मुठीत घेवून वाहने चालवित आहेत. याच मार्गावरील दोन ते तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने भरधाव वाहने खड्यातून जाताना बंद पडतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहनाची कोंडी देखील होते. वाहने अनियंत्रीत होवून दुभाजकावर आदळण्याची भीती वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Hazardous traffic on interstate lanes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.