पोलिसांना वॉन्टेड १११ पसार आरोपींना आपण पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:17+5:302021-09-16T04:44:17+5:30

भंडारा जिल्ह्यात १११ वॉन्टेड आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची शोध मोहीम ...

Have you seen the accused passing 111 wanted to the police? | पोलिसांना वॉन्टेड १११ पसार आरोपींना आपण पाहिले का?

पोलिसांना वॉन्टेड १११ पसार आरोपींना आपण पाहिले का?

भंडारा जिल्ह्यात १११ वॉन्टेड आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची शोध मोहीम जारी असते. गत ऑगस्ट महिन्यात तब्बल १८ पसार आरोपींना जेरबंद करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पसार असलेल्या आरोपीची संख्या ५६ असून पाच वर्षावरील २० आणि पाच वर्षाखालील ३५ पसार आरोपी जिल्ह्यात आहेत. न्यायालयाने केवळ एका आरोपीला फरार घोषित केले असून तो साकोली तालुक्यातील आहे.

बॉक्स

दहा वर्षापासून ५६ आरोपींचा शोध

जिल्ह्यात दहा वर्षांपासून ५६ आरोपींचा शोध भंडारा जिल्हा पोलीस घेत आहे. मात्र अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

सर्वाधिक पसार आरोपी भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्यांची संख्या २७ आहे. तर तुमसर ठाण्यांतर्गत १८ जण पसार आहेत.

या आरोपींना शोधण्यासाठी ऑगस्ट महिन्यात विशेष मोहीम राबवून १८ जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.

बॉक्स

अनेक जण परप्रांतात

जिल्ह्यात गुन्हा केल्यानंतर अनेक जण पसार होतात. त्यातील बहुतांश आरोपी परप्रांतात धाव घेतात. यातील काही आरोपी धाब्यावर व इतर ठिकाणी नाव बदलून काम करतात. त्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेणे कठीण जाते. असे आरोपी अनेकदा आपल्या मूळगावी येतात. परंतु त्यांची माहिती पोलिसांना कुणी देत नाही. त्यामुळे या आरोपींचे चांगलेच फावते.

कोट

जिल्ह्यात वॉन्टेड आरोपींची संख्या १११ असून त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली जाते. सायबर सेलच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येतो. असे फरार आरोपी आपल्या गावात अथवा परिसरात दिसल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.

Web Title: Have you seen the accused passing 111 wanted to the police?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.