वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:21 IST2017-02-16T00:21:54+5:302017-02-16T00:21:54+5:30
तालुक्यातील मांगली (चौरास) येथील रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक (प्रवचनकार) अजय थाळीराम बावनकर याचे अल्पशा आजाराने निधन झाले.

वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक हरपला
पवनी : तालुक्यातील मांगली (चौरास) येथील रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचा बाल प्रवर्तक (प्रवचनकार) अजय थाळीराम बावनकर याचे अल्पशा आजाराने निधन झाले. तो जिल्हा परीषद पूर्व माध्यमिक शाळेतील इयत्ता चवथीचा विद्यार्थी होता. बाल प्रवर्तकाच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
शिक्षण घेण्याचा वयात अजय बावनकर याने वारकरी संप्रदायाचा प्रचार सुरु केला होता. आजोबा ज्ञानेश्वर यांच्याकडून त्याने वारकरी संप्रदायाचा वसा घेतला होता. तो आईवडीलांना एकूलता होता. भजन, कीर्तनाची आवड असल्याने त्याने मृदंग वाजविण्याची कला आत्मसात केलेली होती. दरदिवसाला मंदिरातील हरिपाठिने त्याची दैनंदिनी सुरु होत होती. त्याची आई चेतना शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य आहे. अजयच्या मागे आई, वडील, आजोबा, आजी, एक बहिण असा आप्त परिवार आहे.
त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले संतमंडळी अश्रु आवरु शकले नाही. असा गावातील बालहिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)