हरदोली ग्रामपंचायतीने उभारली वेशीवर तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:26+5:30

नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे.

Hardoli Gram Panchayat erected ramparts at the gate | हरदोली ग्रामपंचायतीने उभारली वेशीवर तटबंदी

हरदोली ग्रामपंचायतीने उभारली वेशीवर तटबंदी

ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात : ग्राम संरक्षक दलाची स्थापना, गावात येणाऱ्यांची केली जाते नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना भंडारा जिल्हा कोरोना मुक्त आहे. तो कोरोनामुक्तच राहावा यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहे. आता त्याला गावकरीही साथ देत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली ग्रामपंचायतीने तर गावच्या वेशीवर तटबंदी उभारली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा दलासमोर हजेरी घेतली जाते. महानगरातून येणाºया अनोळखी व्यक्तींना गावात बंदी घालण्यात आली आहे.
नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा बंद करणे सुरु केले आहे. हरदोली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या मार्गदर्शनात २३ युवक या सुरक्षा दलात सहभागी झाले आहेत. कोविड-१९ ग्राम संरक्षण दल असे नाव ठेवले आहे. समितीत अध्यक्ष, सरपंच, सचिव, पोलीस पाटील, निमंत्रक म्हणून ग्रामसेवक आणि २६ सदस्य आहेत.
गावात शिरण्यासाठी चार रस्ते आहेत. त्यातील एक रस्ता नागपूरकडून येतो. त्या चारही ठिकाणी सुरक्षा रक्षक आळीपाळीने कडा पहारा देत असतात. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करुन नोंद घेतली जाते. बाहेरुन येणाऱ्यांवर नियंत्रण राहावे, गावात विणाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर अंकुश लावावा, गावात गर्दी कमी व्हावी आदी उपाययोजना केल्या जातात. या सर्व सर्वांवर देखरेख सरपंच सदाशिव ढेंगे, पोलीस पाटील पंढरीनाथ झंझाड, ग्रामसेवक गोपाल बुरडे आदी करीत आहेत. लॉकडाऊनपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहेत.

परप्रांतीयांना वाहनातून दिले सोडून
मध्यप्रदेशातील अनेक मजूर औरंगाबादमधून पायी आपल्या गावाकडे जात होते. हरदोलीवरुन जात असताना हा प्रकार सुरक्षा दलाच्या लक्षात आला. त्यांनी या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून अन्नधान्याची किट देण्यात आली. या सर्वांना एका वाहनाने तुमसर येथे सोडून देण्यात आले.

बाहेरुन माणसे कुठून येतात. याची माहिती व्हावी, तसेच गावात कोरोनाचा संशयित शिरु नये म्हणून उपाययोजना करण्यात आली. गावच्या चारही वेशीवर ग्रामरक्षक ठेवण्यात आले आहे.
-सदाशिव ढेंगे, सरपंच हरदोली

Web Title: Hardoli Gram Panchayat erected ramparts at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.