तुमसर येथे सखी महोत्सव
By Admin | Updated: December 26, 2015 00:44 IST2015-12-26T00:44:29+5:302015-12-26T00:44:29+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुमसर येथे सखी महोत्सव
तुमसर : लोकमत सखी मंचच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता येथील श्यामसुंदर सेलिब्रिशेन हॉलमध्ये या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सखी, युवती व महिला स्पर्धेत नि:शुल्क सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत एकल नृत्य वेळ ३ ते ५ मि., युगल नृत्य वेळ ३ ते ५ मि. समुह नृत्य वेळ ५ ते ७ मिनिट देण्यात येईल.
समुहामध्ये किमान ६ ते ८ सदस्य असणे अनिवार्य आहे. सखींनी आपले गाणे पेनड्राईव्हमध्ये आणावे. एकपात्री अभिनव वेळ ३ मिनिट व पथनाट्य वेळ ५ ते ७ मिनिट देण्यात येईल.
विजेत्या स्पर्धेकांना बक्षिस देऊन गौरविण्यात येईल तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरीय सखी महोत्सवात सहभागी होता येईल. स्पर्धेकरिता नाव नोंदणी दि.२९ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे करावी. अधिक माहितीकरिता तालुका विभाग प्रतिनिधी रितु पशिने (८१७७९३२६१३) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)