सखींनी घेतला सखी व्यंजनांचा आस्वाद
By Admin | Updated: December 31, 2014 23:20 IST2014-12-31T23:20:39+5:302014-12-31T23:20:39+5:30
लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील राजीव गांधी चौक स्थित खान मॅरेज हॉलमध्ये ‘फूड फॉर मूड’ या कुकरी शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखी मोठ्या संख्येन‘ सहभागी झाल्या.

सखींनी घेतला सखी व्यंजनांचा आस्वाद
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील राजीव गांधी चौक स्थित खान मॅरेज हॉलमध्ये ‘फूड फॉर मूड’ या कुकरी शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखी मोठ्या संख्येन‘ सहभागी झाल्या. यावेळी सखींनी विविध प्रकारच्या शाही व्यंजनांचा आस्वाद घेतला.
शेफ समीर दामले यांनी उपस्थितांना एकूण २५ प्रकारचे व्यंजन बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यात अनुक्रमे वेज सूप, मंच्चाव सूप, टोमॅटो सुप, शेजवान सॉस, व्हाईट ग्रेव्ही पुलाव, मटर पनिर पुलाव, व्हेज फ्राईड राईस, व्हेज शेजवान राईस, व्हेज शेजवान नुडल्स, मंच्युरियन, भेंडी कुरकुरित, दालफ्राय, दाल तडका, मटर पनिर, मेथी मटर मसाला, पालक पनीर, पनिर बटर मसाला, मिक्स रेज, वेजमखानी, पनीर भुर्जी व चायनिज भेल इत्यादी पदार्थाचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच घरगुती महत्वाच्या टिप्स दिल्या. निरोगी शरीर कसे राहणार याचेदेखील मार्गदर्शन केले.
व्यायामाचे महत्त्व पटवून दिले व मुलांच्या आवडिचे पदार्थ झटपट कसे करायचे याबद्दल सांगितले. या कुकरी शोमुळे सखींना बरेच पदार्थ बनविण्यासाठी प्रेरणा मिळाली. आपल्या मुलांना तसेच घरच्या मंडळींना वेगवेगळे रेस्टॉरन्टसारखे पदार्थ घरच्या घरी, कमी वेळेत, कमी खर्चात होईल व सगळ्यांनाच आस्वाद घेता येईल.
संचालन जिल्हा संयोजक यांनी केले. तर आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. राखी सूर, मंगला डहाके, सुहासिनी अल्लडवार, कल्पना डांगरे, दीपा काकडे, अजु पिपरेवार, मनीषा रक्षिये, सोनाली तिडके, मनीषा इंगळे, स्रेहा वरकडे, हर्षा रक्षिये, दिगांबर बारापात्रे, अर्चना गुर्वे, सुधा बत्रा, तिघरे यांनी सहकार्य केले. मेघा पराते, हेमा मासुरकर, भवसार, भारती जांभुळकर, केकत, वंदना गुरूमुखी मंदा कडव, चंद्रमाला गांधी, सुनंदा तईकर, पूनम डहाके उपस्थित होत्या. (मंच प्रतिनिधी)