आरोपींना फाशी द्या!
By Admin | Updated: July 30, 2016 00:31 IST2016-07-30T00:31:34+5:302016-07-30T00:31:34+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या लैगीक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी...

आरोपींना फाशी द्या!
कोपर्डी येथील प्रकरण : राकाँचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
साकोली : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या लैगीक अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदारामार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनानुसार कोपर्डी येथील मुलीवर लैगीक अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यातील आरोपींना पळवून त्यांना पाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच महामगाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले. त्यामुळे महागाई कमी करण्यात यावी यात घरगुती वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करण्यात यावे, उन्हाळी धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेतातील पेरणी ते मळणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार रूपये पेंशन देण्यात यावी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मासिक दोन हजार रूपये मानधन देण्यात यावे, नियमित रोहयोअंतर्गत फळबाग योजनेला मंजुरी देण्यात यावी, साकोली व सेंदुरवाफाच्या या गावातील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे औषधीसाठा नियमित करावा या मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी आशा हटवार, लता परसगडे, लता दुरूगकर, वंदना दोनोडे, मिनाक्षी सपाटे, अपर्णा मासूरकर, सविता शहारे, कौशल्याबाई नंदेश्वर, सुरेखा शहारे, वैशाली हेमकृष्ण वाडिभस्मे, सुदाम वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे व भारद्वाज उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)