उर्स कार्यक्रमात बहुजनांचे सरसावले हात
By Admin | Updated: March 21, 2017 00:28 IST2017-03-21T00:28:17+5:302017-03-21T00:28:17+5:30
देवरी (देव) गावात असणाऱ्या मुस्लीम बांधवाच्या दर्ग्याची जोपासना बौद्ध आणि हिंदू बांधव पुरातन काळापासून करीत आहेत.

उर्स कार्यक्रमात बहुजनांचे सरसावले हात
देवरीत एकतेचा आदर्श : बौद्ध-हिंदू करतात महाप्रसाद वितरीत
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
देवरी (देव) गावात असणाऱ्या मुस्लीम बांधवाच्या दर्ग्याची जोपासना बौद्ध आणि हिंदू बांधव पुरातन काळापासून करीत आहेत. हा दर्गा एकतेचा संदेश देणारी ठरत असून मंगळवारला २१ ला गावकऱ्यांच्या वतीने उर्स निमित्त महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
वैनगंगा नदी काठवर असणाऱ्या देवरी (देव) गावात दिड हजार लोकवस्ती आहे. या गावात बहुसंख्य हिंदु आणि बौध्द धर्मीय बांधवाचे वास्तव्य आहे. गावात मुस्लिम बांधवाचे वास्तव आणि घरे नाहीत. पुरातन काळापासून या गावात हजरत बाबा शेख फरिद यांचा दर्गा आहे. ब्रिटिश कालावधीपासून हा दर्गा असल्याने सांगण्यात येत आहे.
गावात बहुसंख्य बौद्ध आणि हिंदू बांधवाचे वास्तव्य असले तरी दर्ग्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या पध्दतीने करण्यात येत आहेत. उर्सनिमित्त रॅली लंगर आणि चादर आदी विधिवत पूजा पाठ मुस्लीम पध्दतीच्या नियमानेच गावकरी करीत आहेत. गावात उर्सनिमित्त नाविण्यपूर्ण वातावरणात निर्मिती करण्यात येत आहे. दरगाह मध्ये आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात बौध्द आणि हिंदु बांधव हिराहिरीने सहभाग घेत आहेत.
दर्ग्याच्या नियंत्रणासाठी समिती गठीत करण्यात ाअली आहे. या समितीत गावातील हिंदू आणि बौध्द बांधव आहेत. दरगाह मध्ये आयोजित कार्यक्रमात आर्थिक देणगी गावकरी गोळाकरीत आहे. दरगाहची स्वच्छता आणि पुजापाठ गावातील हिंदुबांधव भक्तप्रल्हाद खडसे करीत आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन खडसे यांनी या दरगाहची जबाबदारी खांदावर घेतली आहे. दर्गा परिसर मोठा असला तरी उपेक्षीत आहे.
लोकप्रतिनिधींचा निधी या दरगाह विकासाकरिता अद्याप पोहचला नाही. सर्वधर्म समभाव आणि जगाला एकतेचा संदेश देणाऱ्या या दरगाह परिसरात विज्ञान घडून आला नाही.
सभा मंडप, पिण्याचे पाणी, आवार भिंत आदींची सोय करण्यात आली नाही. जुन्या आणि जिर्ण दरगाह बांधकामासाठी विशेष निधीची मंजुरी करण्यात आली नाही. गावकरी स्वमर्जीने सढळ हाताने आयोजित कार्यक्रमात आर्थिक मदत करीत आहेत. नजीकच्या गावातील भाविक या दरगाहात माथा टेकण्यासाठी मोठ्या श्रध्देने येत आहेत. यामुळे गावातील बौद्ध आणि हिंदु बांधवाच्या एकतेचा संदेश देणारा ही दर्गा ठरली आहे. मंगळवारला दर्गा परिसरात गावकरी रॅलीत सहभागी होणार आहेत. गावकऱ्यांचे वतीने महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
गावातील महिला व पुरुष या आयोजित ऊर्स कार्यक्रमात उपस्थितीची नोंद दर्शविणार आहेत. दरग्यात उर्स निमित्त पारंपारिक पध्दतीनुसार गावकऱ्यांनी यदांही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जाती धर्माचे बंधणे तोडून या गावात सर्व धार्मिक देवस्थान आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात बहुजणांची उपस्थिती म्हणजेच एकतेचा संदेश देणारी ठरत आहे.