शैक्षणिक दर्जा वाढविण्याची किमया मुख्याध्यापकांच्या हातात
By Admin | Updated: July 2, 2014 23:13 IST2014-07-02T23:13:57+5:302014-07-02T23:13:57+5:30
मुख्याध्यापकांने चांगले प्रशासन तर चालवावेच शिवाय सामाजिक नाते जोपासावे. मुख्याध्यापकांच्या हातात शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीच्या जादूची कांडी आहे. त्या जादूच्या कांडीचा वापर

शैक्षणिक दर्जा वाढविण्याची किमया मुख्याध्यापकांच्या हातात
मुख्याध्यापकांची सभा : शिक्षणाधिकारी शेंडे यांचे प्रतिपादन
भंडारा : मुख्याध्यापकांने चांगले प्रशासन तर चालवावेच शिवाय सामाजिक नाते जोपासावे. मुख्याध्यापकांच्या हातात शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीच्या जादूची कांडी आहे. त्या जादूच्या कांडीचा वापर कौशल्याने करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) चे शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी केले.
आम आदमी विमा योजना तसेच शासनाच्या शालेय विभागाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेला मंचावर उपशिक्षणाधिकारी (माध्य.) एस.आर. आयलवार, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) आर.आर. गाढवे, गटशिक्षणाधिकारी माधव फसाटे, बी.आर. पारधी, नंदनवार, विज्ञान पर्यवेक्षक एल.डी. बालवाड, विषयतज्ज्ञ बी.पी. मुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी आर.जे. गणवीर, प्राचार्य घाटे, एस.डी. चंद्रिकापुरे यांची उपस्थिती होती. बैठकीत आम आदमी विमा योजनासंबंधी माहिती देण्यात आली. ३० जूनपर्यंत आम आमदी विमा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या बीईओंकडे देण्यात यावे, असे सांगण्यात आले. जुलैअखेरपर्यंत फॉर्म भरण्याचे निर्देश देण्यात आले. आता शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांना एक तारखेलाच वेतन मिळणार असल्याचे वेतन पथकाकडून सांगण्यात आले. शालार्थ प्रणालीचा पासवर्ड दर महिन्यात बदल करण्याची सूचना देण्यात आली. शाळेत परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती असली पाहिजे.
विद्यार्थिनींसाठी शालेय तक्रार पेटी लावण्याचे निर्देश देण्यात आले. शाळेत गुटका व मोबाईलवर बंदी आणण्याचीही सूचना देण्यात आल्या. आर.टी.ई. अटी व शर्तीचे मुख्याध्यापकांनी पालन करावे, शाळेत १० भौतिक सुविधांची पूर्तता करण्यात यावी, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी ३० जुलैची मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतर भौतिक सुविधा पूर्ण न करणाऱ्या शाळांची मान्यता काढण्यासाठी कारवाई केली जाणार आहे.
यावेळी बहुप्रतीक्षेत असणारी कर्मचाऱ्यांसंबंधी संच मान्यता कशी असावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संच मान्यतेत बराच घोळ आहे. शाळा मुख्याध्यापक/ संस्थेनी संच मान्यता दुरुस्त करून द्यायचा आहे. दुरुस्त करून दिलेला संच मान्यता लवकरच शाळांना शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी तालुकानिहाय शिक्षणाधिकारी (माध्य.) सभा घेणार आहे. सभेला विविध विभागाच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) गाढवे यांनी केले. सभा यशस्वी होण्यासाठी एस.एस. नाईक, जे.एन. डहाके, आर.बी. साखरवाडे, ए.ए. पठाण, कौतुका रंगारी, अरुणा मोटघरे यांनी मदत केली. (नगर प्रतिनिधी)