पावसाअभावी हातचे धानाचे पीक गेले
By Admin | Updated: November 3, 2014 23:20 IST2014-11-03T23:20:36+5:302014-11-03T23:20:36+5:30
या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही

पावसाअभावी हातचे धानाचे पीक गेले
गोसे (बु.) : या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान होवूनही या परिसराची नजरअंदाज आणेवारी ७० ते ७५ टक्केपर्यंत दाखविण्यात आली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. सुरुवातीला एक महिना बिना पावसाचा गेला. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी केली. पण धानाचे पीक अंतिम टप्प्यात असताना एका पावसाची अत्यंत गरज होती.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतीजवळ तलाव, नदी, नाले व इतर जलस्त्रोत होते त्यामधून धानाच्या पिकाला सिंचन करून आपले धानाचे पीक वाचविले. पण ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सुविधा नव्हती त्या शेतकऱ्यांचे धानाचे उभे पिक डोळ्यासमोर वाळत होते. पण याला काहीही उपाय नसल्यामुळे ही पिकाची स्थिती पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेतात या धानाच्या पिकाचे रुपांतर तणसीत झाले होते. या परिसरातील अर्धे अधिक धानाचे पिक एक पावसाने गेले आहे.
या शेतकऱ्यांनी सावकार, बचत गट, वित्तीय संस्था, बँक आदींकडून शेतीकरिता कर्ज काढले होते. पण या वर्षी त्यातील व्याजाचे पीक गेल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. या शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)