गारपीटग्रस्तांची पुन्हा निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:15 IST2019-02-02T23:15:19+5:302019-02-02T23:15:39+5:30

आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे. आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.

Hail again disappointment of hailstorm | गारपीटग्रस्तांची पुन्हा निराशा

गारपीटग्रस्तांची पुन्हा निराशा

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनामे उशिरा होणार तर मदत लवकर कशी मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे.
आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.
खरीप हंगामानंतर रबी पिकात फायदा होईल, या आशेने शेतकºयांनी कठाण पिकासह धानाची लागवड केली. मात्र आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे जिल्ह्यातील गोदामाबाहेर व धान खरेदी केंद्र परिसरात ठेवलेली शेकडो क्विंटल धान ओले झाले. त्याचाही फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पावसामुळे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, वाटाणा, लाखोरी मुंग आदी कठाण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हरभरा व गहू पीक वादळी वाºयामुळे अक्षरश: जमिनीवर झोपल्या गेले. मात्र त्याचवेळी मोका पंचनामे करण्यात आले नाहीत.
सद्यस्थितीत येणाºया दिवसात प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला तरी त्याचा फायदा होणार नाही. भंडारा, पवनी, साकोली या तीन तालुक्यात अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आली होती. मोहाडी तालुक्यात गारपिटीसह पाऊस बरसला होता. चौरास पट्ट्यात रबी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र वेळीच मोका चौकशी करण्यात आलेली नाही.
धान झाले 'पाखर'
अवकाळी पावसामुळे धान्य खरेदी केंद्रासमोर ठेवलेली धानाची शेकडो पोती ओली झाली. त्यामुळे धान ओले झाल्याने मिलिंग नंतर तांदळाची गुणवत्ता परिणामत: कमी होते. धान मिलिंग केल्यानंतर तांदूळ पाखर (बेचव) होत असतो. अशा धानाला भावही कमी मिळत असल्याने याचा सरळसरळ फटका शेतकºयांना बसतो. दुसरीकडे नुकसान झाल्याची भरपाईसुद्धा न मिळाल्याने शेतकºयांना दुहेरी फटका बसणार आहे.

Web Title: Hail again disappointment of hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.