पालकमंत्र्यांनी केली ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST2021-05-05T04:57:49+5:302021-05-05T04:57:49+5:30
रुग्णांना नियमित उपचार द्यावे, जेवणाचा दर्जा उत्तम असावा, स्वच्छता ठेवावी व रुग्णांचे समुपदेशन, योगा, आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ...

पालकमंत्र्यांनी केली ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
रुग्णांना नियमित उपचार द्यावे, जेवणाचा दर्जा उत्तम असावा, स्वच्छता ठेवावी व रुग्णांचे समुपदेशन, योगा, आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी या भेटीत सांगितले. यावेळी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय येथे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला.
आमदार अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, माजी आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, तहसीलदार आदेश डफळ, अपर तहसीलदार अनिल खडतकर, बाई गंगाबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर सोनारे उपस्थित होते.