भूगोलाला जीवनातील महत्त्वानुसार जपा
By Admin | Updated: January 16, 2016 00:41 IST2016-01-16T00:41:47+5:302016-01-16T00:41:47+5:30
भूगोलशास्त्र हा विषय हा माणसाच्या जीवनात किती उपयुक्त व किती सार्वत्रिक आहे. त्यांची जपवणूक करुन त्याला न्याय दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. गणेश कापसे यांनी व्यक्त केले.

भूगोलाला जीवनातील महत्त्वानुसार जपा
कार्यक्रम : गणेश कापसे यांचे प्रतिपादन
पालांदूर (चौ.) : भूगोलशास्त्र हा विषय हा माणसाच्या जीवनात किती उपयुक्त व किती सार्वत्रिक आहे. त्यांची जपवणूक करुन त्याला न्याय दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. गणेश कापसे यांनी व्यक्त केले.
श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे गुरुवारला जागतिक भूगोलशास्त्र दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गिरीश लांजेवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. संजय कुमार निंबेकर, भूगोलशास्त्र विषयाचे प्रा. गोपाल तलमले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गिरीश लांजेवार यांनी, भूगोल शास्त्र विषयाचे महत्व व पर्यावरणीय समस्या यावर विस्तृतपणे चर्चा केली व भूगोलशास्त्र विषयाला प्रत्येक माणसाने जीवनात आणण्याचे आव्हान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. संजय कुमार निंबेकर यांनी केले. व्यासपीठावर उपस्थित भूगोलशास्त्र विषयाचे प्रा. गोपाल तलमले यांनी भूगोलशास्त्रातील अभ्यासक्रमाला जागतिक पातळीवरील नोबेल पुरस्कारापासून वंचित ठेवल्याबद्दल खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचे परिचय भूगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. नितीन थुल यांनी करुन दिला. संचालन राहुल आथिलकर यांनी केले तर आभार हत्तीमारे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. गजभिये, प्रा. डॉ. खंडाईत, प्रा. अनिल कठाणे, बी. सी. घरडे, छबू ठलाल, अश्विनी शिवणकर, पौर्णिमा कोहपरे, अश्विनी सेलोकर, भेंडारकर, यादोराव पराते, दुर्योधन कावळे, संदीप सेलोटे, मंगेश टांंगले, पितांबर भोयर आदीनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)