गळती थांबविण्यासाठी ‘गट पासिंग’ योजना
By Admin | Updated: May 30, 2016 00:55 IST2016-05-30T00:55:33+5:302016-05-30T00:55:33+5:30
इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे.

गळती थांबविण्यासाठी ‘गट पासिंग’ योजना
इयत्ता नववीच्या परीक्षा ७५० गुणांची : शिक्षण विभागाचा निर्णय
शिवशंकर बावनकुळेसाकोली
इयत्ता नववीमध्ये गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. बहुतांशी शाळांमध्ये दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी नववीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. यामूळे शासनाने इयत्ता नववीची विशेषत: मुलींचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्यासाठी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालकांनी शाळांना सुधारित धोरणांची अंमलबजावणी केली आहे.
इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर ३० दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करवून घेऊन १० जुलैपर्यंत परीक्षा घेऊन २१ जुलैला उत्तीर्णचा निकाल लावण्यात येणार आहे. यात किमान अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत प्रवेश द्यावा. तसेच २० जुलैपूर्वी पालकांची मागणी असली तरी टीसी देऊ नये, १०० टक्के निकाल असणाऱ्या निवडक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची टिमकडून निकाल कमी असणाऱ्या शाळांना उद्बोधन केले जाणार आहे. कमी निकालाच्या शाळांचा अहवाल शिक्षणाधिकारी उपसंचालकांना कळविणार आहेत. इयत्ता नववीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा प्रत्येकी १०० गुण विज्ञान व तंत्रज्ञान १००, गणित १०० गुण, समाजशास्त्र १०० गुण, आयसीटी ५० गुण, व्यक्तिमत्व विकास ५० गुण, शारीरिक शिक्षण ५० गुण अशी ७५० गुणांची प्रथमसत्र व द्वितीय सत्र अशा दोन परिक्षा होतील. प्रत्येक विषयात ३५टक्के उत्तीर्णसाठा आवश्यक आहे. परंतु अनुत्तीर्ण झाल्यास गटपासिंग राहील यात तीन भाषा विषयांच्या गुणांची बेरीज १०५ असावी एका विषयात किमान २५ पेक्षा कमी कुण नको. गणित व विज्ञान विषयाचागट करावा या दोन विषयाची बेरीज ७० असावी पंरतु प्रत्येक विषयात २५ पेक्षा कमी गुण नसावे असे करुनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ग्रेस गुण एकूण २० द्यावे, ग्रेस गुण एकूण बेरजेत घ्यावे. गेस लावलेल्या विद्यार्थ्याला सपास असा शेरा द्यावा. एवढे करुनी मुलगा नापास करावे. निकाल ३० एप्रिलला असणार आहे. शाळेचा शेवटचा दिवस १ मे व शाळा सुरु होण्याचा दिनांक १५ जून राहणार आहे. एखाद्या विद्यार्थी एखाद्या परीक्षेत गैरहजर असेल तर त्याच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावे. त्याने दिलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांना दोननेच गुणायचे आहे. त्याची पुन्हा परीक्षा घेऊ नये. अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे.
विद्यार्थ्यांची सर्व विषयाची क्षमता मुलापर्यंत प्राप्त होईपर्यंत त्यांना ज्ञानार्जन करणे काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहींना उशिरा कळते. क्षमता प्राप्त होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. शिक्षकाना यामुळे त्रास होण्यास कारण नाही.
- सुभाष बावनकुळे,
प्र. गट शिक्षणाधिकारी साकोली