अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By Admin | Updated: April 18, 2016 00:32 IST2016-04-18T00:32:03+5:302016-04-18T00:32:03+5:30

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा लाखनीची दिलीप वाघाये गटशिक्षणाधिकारी पं.स. लाखनी व अधिक्षक संजय तिरसागडे यांच्याशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Group of All India Primary Teachers Association | अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

लाखनी : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा लाखनीची दिलीप वाघाये गटशिक्षणाधिकारी पं.स. लाखनी व अधिक्षक संजय तिरसागडे यांच्याशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव, उच्च परिक्षेला बसण्याची नियमीत व कार्योत्तर परवानगी, जी. पी. एफ व जिवन विमा विषयक तक्रारी, अतिरिक्त शिक्षकांचे समयोजन व बदल्या आयकर विषयक तक्रारी, वैद्यकीय प्रतीपूर्ती प्रस्ताव व देयक मंजूरी, सेवेत कायम करण्यासंदर्भातील प्रस्ताव, डी. सी. पी. एस. ची माहिती जि.प. ला पाठविणे व खात्यावर जमा करणे, पदवीधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, प्रगत महाराष्ट्र अंमलबजावणी, मुळ सेवापुस्तक व दुय्यम सेवापुस्तक अद्यावत करणे ह्याशिवाय केन्द्रप्रमुखांच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिला. शिष्टमंडळात संतोष खंडारे, डी.एन. ठवकर, मुलचंद वाघाये, रुपचंद निर्वाण, हिरामण वाघाये, विलास टिचकुले, डी.एस. डडेमल, वा.सी. देशपांडे, आनंदराव उरकुडे, कुसुमाकर बोन्द्रे, रमेश बोपचे, भावीक रामटेके, शेषराव लांडगे, महेश चोले, किशोर कठाने, कृष्णा सेलोकर, विजय डाभरे, मिताराम लांडगे, शालू उरकुडे, उषा कठाणे, ललीता मेश्राम, संतोष सिंगनजुडे, ठानेश्वर वाडीभस्मे, यु.बी. शेन्डे, विनू वाघाये, शा.डो. खंडाईत, बी.जी. भोयर, दिपक बागडे, मधुसुदन डहीक, डी.बी. झिंगरे, विलास काडगाये, भगवान गायधने, तसेच सरचिटणीस महेन्द्र लांजेवार, अध्यक्ष रसेषकुमार फटे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Group of All India Primary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.