मुरमाडी ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार

By Admin | Updated: June 1, 2015 01:13 IST2015-06-01T01:13:19+5:302015-06-01T01:13:19+5:30

तालुक्यातील मुरमाडी (सावरी) चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता...

Ground-water management in Murmadi Gram Panchayat | मुरमाडी ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार

मुरमाडी ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार

लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करतात, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य नीलेश गाढवे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
ग्रामपंचायतीमधील बारमाही सफाई कामगारांना सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामावर आढळून आले आहेत. सदर कर्मचारी नाल्याची सफाई तसेच कचरागाडीने कचरा गोळा करून कचऱ्याची विल्हेवाट लावत असतात. परंतु ग्रामपंचायत ठेकेदारी करीत असून नालीबांधकाम व सिमेंट रस्त्यावर सफाई कामगारांना पाठविण्यात येत असते असा आरोप गाढवे यांनी केला आहे. यामुळे गावातील नाल्या साफ होत नाही. मुरमाडी ग्रामपंचायतीने घरटॅक्स वाढविला आहे. त्या तुलनेत गावातील लोकांना सुविधा देण्यात येत नाही.
ग्रामपंचायतला मागील दोन वर्षापासून शौचालय यादीचे अर्ज मिळाले आहेत. परंतु अद्यापही एकही शौचालय तयार करून देण्यात आले नाही. घरकूल मिळावा यासाठी ग्रामपंचायतला अर्ज निवेदन दिले आहे. परंतु २०१४-१५ मध्ये एकही घरकूल देण्यात आले नाही. मग्रारोहयोच्या माध्यमातून गाईचे गोठे बांधण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. परंतु ही योजना राबविण्यास ग्रामविकास अधिकारी व सरपंच अपयशी ठरले आहेत. वार्ड क्र. ५ मध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा साखरे यांनी सिमेंट रस्त्याची दोन वर्षापासून मागणी केली आहे. परंतु रस्ता तयार करण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नीलेश गाढवे यांनी केला आहे. मासिक सभेला सरपंच निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येत असतात.
ग्रामविकास अधिकारी पाटे शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत नाही. ग्रामपंचायतच्या कामावर ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने पाटे यांना निलंबित करण्याची मागणी गाढवे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ground-water management in Murmadi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.