किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड दुकाने सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:45+5:30

जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या सवलत योजनांचे फलक दुकानांसमोर लावण्यात आले आहेत.

Groceries, electronics, textile shops | किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड दुकाने सजली

किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड दुकाने सजली

ठळक मुद्देबाजारपेठ हाऊसफुल : विधानसभा निवडणुकीमुळे दिवाळीच्या खरेदीला उशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दसरा सणाच्या पुर्वीपासून सुरु झाली. मतमोजणी दिवाळीच्या तोंडावर झाली, आता सर्वांची खरेदीची धांदल उडाल्याने शहरातील सर्वच दुकानात गर्दी झाली आहे.
शहरातील मोठा बाजार परिसरात सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी केली होती. जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या सवलत योजनांचे फलक दुकानांसमोर लावण्यात आले आहेत. तसेच कपडे खरेदीवरही तीन ड्रेसवर एक ड्रेस फ्री अशा पद्धतीने ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. हीच अवस्था अनेक किराणा दुकानांमध्ये दिसून येत आहे. आॅनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढला असला तरीही शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असलेली दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जरी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना वेळ मिळाला नसला तरी निकालानंतर मात्र कार्यकर्त्यांसह अनेकजण बाजारपेठेत खरेदीसाठी दिसत आहे. दिवाळीला सुरुवात झाली असली तरीही ग्रामीण भागात आजही राजकीय गप्पांचे फड रंगले आहे. एकीकडे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीची गर्दी दिसून येत आहे तर दुसरीकडे वाहन खरेदीसाठीही मोठमोठ्या शोरूममध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी बुकींग सुरु केल्याचे दिसते

Web Title: Groceries, electronics, textile shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.