जांभोरा येथे धान्याची अफरातफर

By Admin | Updated: January 5, 2015 22:58 IST2015-01-05T22:58:54+5:302015-01-05T22:58:54+5:30

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील दोन राशन दुकानापैकी एका दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केला. मात्र दुसऱ्या दुकानाला अभय का? असा प्रश्न जांभोरा

Grenadine in Jambhora | जांभोरा येथे धान्याची अफरातफर

जांभोरा येथे धान्याची अफरातफर

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील दोन राशन दुकानापैकी एका दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केला. मात्र दुसऱ्या दुकानाला अभय का? असा प्रश्न जांभोरा येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
जांभोरा येथील दोन राशन दुकानातील गैरप्रकाराची बाब सर्वश्रृत आहे. जांभोरा येथील राशन दुकानदारांनी लाभार्थ्यांची फसवणूक करीत धान्याचे वाटप केले नाही. त्यांच्या हक्काच्या धान्याची परस्पर विल्हेवाट लावून अफरातफर केली. अंत्योदय योजनेत अनेक लाभार्थ्यांची नावे दोनदा समाविष्ट आहेत. बीपीएल व एपिएल लाभार्थ्यांमध्येही मृत व्यक्तिचे व बोगस नावांचा समावेश करुन, युनिटची संख्या वाढवून जास्तीच्या राशनची प्रती महिन्याला उचल करुन धान्याची अफरातफर केल्याचा आरोप नागरिकांनी केला. या तक्रारीवर नायब तहसिलदार मलेवार यांनी चौकशी केली. चौकशीत दुकानदारांनी अडथळा आणुन दस्तऐवज देण्यासाठी नकार दिला. दोन्ही दुकानाच्या गैरकारभाराचा अहवाल जिल्हा अन्नपुरवठा अधिकाऱ्यांकडे तहसिलदारांच्या मार्फत पाठविला गेला. मात्र एकाच दुकानाचा परवाना निलंबित करुन डिएसओ मोकळे झाले. दुसऱ्या दुकानावरील कारवाई थंड बस्त्यात ठेवली.
दुसऱ्या दुकानातही अंत्योदय योजनेत १० ते १५ लाभार्थ्यांची नावे दोनदा समाविष्ट आहेत. बीपीएल व एपिएल मध्ये मृत व्यक्तिंचे व बोगस लाभार्थ्यांची नावे आहेत. युनिटची संख्या वाढवून धान्याची उचल नियमित केली जात आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयातून मागितलेल्या माहितीवरुन स्पष्ट दिसून येत आहे. गरीब व अत्योंदय योजनेत समाविष्ट ९ लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या धान्याची उचल करुनही वाटप केले गेले नाही. त्या लाभार्थ्यांना धान्य मिळावे म्हणून अन्न पुरवठा निरिक्षकांचे पत्र लाभार्थ्यांनी दुकानदाराला दिले. मात्र या पत्राला न जुमानता त्यांना अजुनही राशनचे धान्य दिले नाही. या दुकानांचे परवाने निलंबीत करण्याचा प्रस्ताव तहसिलदारांनी जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठविला असतांना दुकान अजुनही निलंबित झालेले नाही. धान्याची अफरातफर करणाऱ्यांना अभय दिल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दुकानाच्या विशेष तपासणीची चावडी वाचनाची आवश्यकता आहे. (वार्ताहर)

Web Title: Grenadine in Jambhora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.