बायपासला जिल्हा नियोजनाची हिरवी झेंडी
By Admin | Updated: March 27, 2015 00:25 IST2015-03-27T00:25:34+5:302015-03-27T00:25:34+5:30
बऱ्याच वर्षापासून पालांदूर बायपास रस्ता विझनवासात होता. भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने बायपासकरिता अनेक अडचणी होत्या.

बायपासला जिल्हा नियोजनाची हिरवी झेंडी
पालांदूर : बऱ्याच वर्षापासून पालांदूर बायपास रस्ता विझनवासात होता. भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने बायपासकरिता अनेक अडचणी होत्या. जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी खा. नाना पटोलेंच्या प्रयत्नांची बायपासकरिता टोकन रुपात ४० लक्ष रुपयाचे नियोजन केले आहे. त्यामुळे पालांदूर रहदारीला मोठा दिलासा मिळाला असून व्यापाराकरिता मोठी सुविधा होणार आहे.
खराशी पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकामाकरिता ६ करोड रुपये प्रस्तावित झाले आहेत. पावसाळ्यातील रहदारीचा प्रश्न सुटून अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. पालांदूर पाथरी पुलाचे पुनर्गठण होऊन ब्रिजकम बंधारा प्रस्तावित आहे. पालांदूर पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारतीकरिता ५० लक्ष रुपये प्रस्तावित केले आहे. संजय नगर येथील जागा निश्चित केली आहे. खराशी नाल्याच्या पुढे मदनकर कडूकारांच्या शेतकिनारी ३ कोटी रुपयाचा ब्रिजकम बंधारा नियोजनात नियोजित जागा आहे. मामा तलावाची खोलीकरण व मच्छीटँक बांधकाम याकरिता १४ तालवांच्या मंजुरीकरिता मंत्रालयात प्रकरण गेले असून लवकरच विकास कामांना गती मिळणार आहे. विकासाकरिता राजकारण बाजूला सारून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी केले आहे. (वार्ताहर)