दोन वर्षात गडेगाव महामार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:50+5:302021-06-06T04:26:50+5:30

नागपूर महामार्ग विभागांतर्गत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गडेगाव महामार्ग पोलीस केंद्रात अत्यल्प कर्मचारी व एकच अधिकारी आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ...

Great performance of Gadegaon Highway Police in two years | दोन वर्षात गडेगाव महामार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी

दोन वर्षात गडेगाव महामार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी

नागपूर महामार्ग विभागांतर्गत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गडेगाव महामार्ग पोलीस केंद्रात अत्यल्प कर्मचारी व एकच अधिकारी आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने शासकीय नियमानुसार दंडाची वसुली केली जात आहे. गत दोन वर्षात महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव हद्दीत वाहतुकीचे नियम तोडले. या प्रकरणी ५२६१६ वाहनधारकांवर डिवाईस केसेस ओवर स्पीड व विना हेल्मेट कारवाई करण्यात आली. त्यात ३५० पेक्षा अधिक टिप्पर कारवाईचा समावेश आहे. या कार्यवाही दरम्यान ३४३ वाहनधारकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या कारवाईत २ कोटी ६९ लाख ४७ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला

बॉक्स

तुलनात्मकदृष्ट्या अधिक कारवाई

२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अधिक कार्यवाही करण्यात आली आहे. तर २०२० च्या तुलनेत जानेवारीपासून मे महिन्यापर्यन्त पर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. वाहन शिस्तबद्ध चालवण्याबद्दल दोन वर्षात ११५ पेक्षा अधिक जनजागृती प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले तर २०१९ च्या तुलनेत १० टक्के अपघात कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे. २०२० च्या कारवाईत डिवाइस केसेस १५ हजार २६३, ओवर स्पीड व विना हेल्मेट १५०५०, परवाना निलंबित २४२, टिप्पर वर कार्यवाही २५० आणि या कारवाईतून एक कोटी ६६ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा मोटार वाहन अधिनियमानुसार दंड वसूल करण्यात आला आहे. २०२१ ची कारवाईत डिवाइस केसेस १० हजार ८८७, ओवर स्पीड व विना हेल्मेट १० हजार ६५६, परवाना निलंबित १०१, टिप्पर वर कार्यवाही १०० पेक्षा अधिक या कार्यवाहीतून १ कोटी २ लाख ७२ हजार १०० रुपये मोटार वाहन अधिनियमानुसार दंड वसूल करण्यात आला आहे.

कोट

नागपूर महामार्ग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गडेगाव पोलिस मदत केंद्राने मोटार वाहन अधिनियम अंतर्गत उल्लेखनीय कार्य करताना विभागात सर्वाधिक कारवाई केली आहे यात सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचा सहयोग आहे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहन चालवावे.

अमित कुमार पांडे,

प्रभारी, महामार्ग पोलीस केंद्र, गडेगाव

Web Title: Great performance of Gadegaon Highway Police in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.