जिल्ह्यात फलाेत्पादन विकासाला माेठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:32 AM2021-01-22T04:32:28+5:302021-01-22T04:32:28+5:30

भंडारा तालुक्यातील पलाडी, मांडवी येथील फळबागांची पाहणी केल्यानंतर ते शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राच्या उद्घाटन साेहळ्यात बाेलत हाेते. यावेळी ...

Great opportunity for horticulture development in the district | जिल्ह्यात फलाेत्पादन विकासाला माेठी संधी

जिल्ह्यात फलाेत्पादन विकासाला माेठी संधी

googlenewsNext

भंडारा तालुक्यातील पलाडी, मांडवी येथील फळबागांची पाहणी केल्यानंतर ते शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राच्या उद्घाटन साेहळ्यात बाेलत हाेते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश काेटांगले, मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक गिरीधारी मलेवार, गिरीश रणदिवे, मीनाक्षी लांडगे, प्रज्ञा गाेस्वामी, हेमा मदारकर, शेतकरी चिंतामण मेहर उपस्थित हाेते. माणिक त्र्यंबके म्हणाले, कमी खर्चात फळबागांमधून अधिक उत्पादन मिळविता येते. शासनाचे अनुदानही आहे. आंतरपिकातून शेतकऱ्यांना माेठा आर्थिक हातभार लागू शकताे, असे सांगितले. पल्हाडी येथील चिंतामण मेहर यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड याेजनेंतर्गत आंब्याची लागवड केली आहे. या फळबागेची पाहणी त्र्यंबके यांनी केली तसेच मांडवी येथील शेतीशाळेला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना विकेल ते पिकेल याेजेनेंतर्गत सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राचा फायदा मिळणार आहे. कृषी विभाग त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी लाड यांनी शेतीपूरक उद्याेगासाठी कृषी विभागाकडून निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी तर आभार गिरीधारी मलेवार यांनी मानले.

बाॅक्स

शेती पर्यटनातून विकास

जिल्ह्यात भरपूर पाणी असून नैसर्गिक देण जिल्ह्याला मिळाली आहे. शेती पर्यटनाची माेठी संधी भंडारा जिल्ह्यात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी विचार करून याकडे वळावे, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले. तलाव आणि शेती असा मेळ घातल्यास पर्यटक माेठ्या प्रमाणात आकर्षित हाेतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना हाेईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Great opportunity for horticulture development in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.