लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करू पाहत आहे. आंबेडकर वॉर्डात पाण्याची टँक बसविण्यात आली. परंतु त्या योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. रिकामी पाण्याची टँक खाली काढण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडे रस्ते व नाली बांधकामासाठी पैसे आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नाहीत काय? असा प्रश्न विचारला जात आहे.पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली. नवीन पाईप लावण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तरीही आंबेडकर वॉर्डातील समस्या सुटलेली नाही.आंबेडकर वॉर्डात योजनेवर लावलेली पाण्याची प्लास्टीक टाकी रिकामी असून ती आता गांधी वॉर्डातील मागील भागात रिकामी पडलेली आहे. सध्या ती कुठेच वापरण्यात आलेली नाही. त्या टँकला जर भागवत डोहळे यांच्या घराजवळ मांडली तर तिकडील समस्या दूर होते. पण आंबेडकर वॉर्डातील समस्या मात्र जैसे थेच राहते.सध्या नागरिकांना गुंडभर पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढीस लागला आहे. ग्रामपंचायतीकडे रोड व नाल्यांसाठी पैसा आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालीत त्वरीत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नळधारक मोहन किरणापुरे, वासुदेव काळे, जयदेव काळे, राजेश डोहळे, भास्कर साठवणे, भागवत डोहळे, शामराव डोहळे व इतर घरगुती नळधारकांनी केली आहे.आंबेडकर वॉर्डात सर्व ठिकाणी पाण्याची समस्या नाही तर फक्त काही घरापुरती आहे. पाणी समस्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न झालेत. नवे पाईप जोडून पाहिले, परंतु सुधारणा झालेली नाही. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून गाई-म्हशी धुतल्या जातात. समस्येवर उपाययोजनेसाठी विद्युत वितरण कंपनीला सकाळी एक तास वीज पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही.- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.
करडीत पाणी समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST
पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली.
करडीत पाणी समस्या गंभीर
ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : पाणी पुरवठा योजनेची प्लास्टीक टँक उतरविली खाली