पालांदूरात अवैध व्यवसायाचा ग्राफ वाढला

By Admin | Updated: November 16, 2014 22:46 IST2014-11-16T22:46:29+5:302014-11-16T22:46:29+5:30

तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अवैध कमाईचे लालसेपोटी अवैध व्यवसायीकांशी सुत जुळल्याने दिवसा मणीपूर, सायंकाळी कल्याण तर रात्रीचे कुबेर आणि राजधानी

The graph of illegal business has increased in Palanpur | पालांदूरात अवैध व्यवसायाचा ग्राफ वाढला

पालांदूरात अवैध व्यवसायाचा ग्राफ वाढला

लाखनी : तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अवैध कमाईचे लालसेपोटी अवैध व्यवसायीकांशी सुत जुळल्याने दिवसा मणीपूर, सायंकाळी कल्याण तर रात्रीचे कुबेर आणि राजधानी हे सट्टा प्रकार तर अवैध मोहफुल व देशी दारु खुलेआम सुरु असल्यानेगावांचे आरोग्य बिघडण्याच्या मार्गावर असून आवश्यक कामासाठी महिलांना रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
तर या व्यवसायाचे जाळ्यात सुशिक्षित बेरोजगार ओढले जात आहेत व विद्यार्थी व्यसनाधिन होण्याच्या मार्गावर असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या अवैध व्यवसायावर लगाम लावावा अशी ग्रामीण जनतेकडून मागणी होत आहे.
कमी श्रमात लखपती होण्याचे भावनेपोटी अवैध व्यवसायांना ग्रामीण भागात आश्रय मिळत असल्याने श्रमीकांपासून तर पांढरपेशापर्यंत अनेक जण उद्या कोणता नंबर येईल याची आकडेमोड करीत असल्याचे विदारक दृष्य पालांदूर परिसरात दिसत असल्याचे समजते. सट्टा व्यवसायात कोणतीही जोखीम व भांडवल लागत नसल्याने अनेक जण या जाळ्यात ओढले जातात. या धंद्याची आश्रयस्थाने पानटपऱ्या चायदुकान व सार्वजनिक चौक व आमरस्ते आहेत. सध्याचा भाव १ रुपया २५ पैशाला १०० रुपये असल्याने तसेच सकाळी चिट्ठी दाखविताच चुकाऱ्याची सोय उपलब्ध असल्यामुळे आबालवृद्धापासून सर्वच वयोगटातील पुरुष महिला यात ओढले गेले आहेत. पोलीस प्रशासनाचे याबाब द संपूर्ण माहिती असताना वरची कमाई बंद होण्याच्या भितीपोटी या अवैध व्यवसायीकांवर लगाम लावण्याचे सौजन्य पोलिसांकडून दाखविले जात नसून बघ्याची भूमिका घेतली गेल्याने वचक कमी झाला.
त्यामुळे पोलीस जनतेचा मित्र की शत्रू अशी जनमानसात पोलिसांची प्रतिमा निर्माण होण्याचे मार्गावर आहे. पालांदूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील रामपुरी, मुरमाडी (तुप), मेंढा, झरप, खमारी, पालांदूर, जेवनाळा, गुरठा, तई, किटाई याशिवाय अनेक गावात अवैध व्यवसाय सुरु आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The graph of illegal business has increased in Palanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.