९४७ फेरीवाल्यांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचे अनुदान जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:32+5:302021-05-11T04:37:32+5:30
ज्यांना आर्थिक सहाय्य मिळाले नसेल अशांना ११ मे पर्यंत मिळेल पथ विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य वितरीत होईल,अशी माहिती भंडारा नगरपरिषदचे ...

९४७ फेरीवाल्यांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचे अनुदान जमा
ज्यांना आर्थिक सहाय्य मिळाले नसेल अशांना ११ मे पर्यंत मिळेल पथ विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य वितरीत होईल,अशी माहिती भंडारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी विनोद जाधव व शहर प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी दिली. लॉकडॉऊन काळात अनेकांचे हाल झाले होते. त्यामुळे संचारबंदी लागू करताना सरकारने सर्वसामान्य लोकांचे हाल होऊ नयेत यासाठी रस्त्यावरील फेरीवाल्यांना महिन्यासाठी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. सध्या ही मदत अत्यंत कमी असली तरी संकटकाळात दिलासा देणारी असल्याचे फेरीवाल्यांनी सांगितले. यासोबतच काही फिरवल्याने पंधराशे रुपयावरून ही मदत किमान पाच ते सात हजार रुपये सरकारने द्यायला हवी, अशीही मागणी केली. मात्र ठाकरे सरकारने दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही यावेळी अनेकांनी व्यक्त केले. भंडारा शहरात नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत पीएमनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना विविध बँकांमार्फत गतवर्षी कर्ज देण्याची ही योजना केंद्र सरकारने आखली होती. त्या अंतर्गत शहरातील काही फेरीवाल्यांना कर्जही मिळाले आहे. या कर्जदारांसह इतर सर्वच फेरीवाल्यांसाठी सरकारने दिलेली पंधराशे रुपयांची मदत खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यासोबतच ज्या फेरीवाल्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा झालेली नाही त्यांनी आपला सेव्हिंग खाते नंबर तसेच आयएफसी कोड व अन्य कागदपत्राची पूर्तता नगरपरिषद विभागाकडे जमा करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोट शासनाच्या योजनेनुसार भंडारा शहरातील ९४७ फेरीवाल्यांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचे अनुदान जमा केले आहे. मात्र यातही काही जणांचे बँक खाते अथवा अन्य काही कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी काहीजण बाकी आहेत. त्यांच्याही खात्यावर त्वरित मदत जमा होईल.
विनोद जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद, भंडारा
कोट
राज्य सरकारने जाहीर केलेली फेरीवाल्यांसाठीची पंधराशे रुपयांची मदत ही संकटकाळात दिलासा देणारी आहे. यासाठी नगर परिषदेअंतर्गत सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या फेरीवाल्यांना कोरोना संकटातही कर्तव्य निभावत मदत देण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न केले.
प्रवीण पडोळे, शहर प्रकल्प व्यवस्थापक, भंडारा.
बॉक्स
पंधराशे रुपये असले तरी तेही खूप महत्त्वाचे
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या अनेकांना बसत आहे. मात्र अशातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना मदतीसाठी पंधराशे रुपये देण्याची दिलेली घोषणा ही पूर्ण केली. आणि पंधराशे रुपयांची मदतही खात्यावर वर्ग केल्याने अनेक फेरीवाले तसेच सर्वसामान्य वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे पंधराशे रुपयांची मदत जरी कमी असली तरी कोरोना संकटात ही मदत लाख-मोलाची आहे अशी भावनाही काहींनी बोलून दाखवली.