शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजीचे अस्थी विसर्जन करायला गेलेल्या नातवाचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 13:05 IST

विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात आंघोळीसाठी प्रशांत पोहत खोल पाण्यात गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिथेच बुडाला.

पवनी (भंडारा) : आजीच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा येथील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १० वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील आंबोली येथील रहिवासी होता.

प्रशांत धोंडबा ठाकरे(२५) असे या मृत तरुणाचे नाव असून तो शेती करत होता. प्रशांत ठाकरे यांच्या घरी त्यांची आजी मैना पोटे या राहत होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे रविवारी निधन झाले. अंत्यविधी आंबोली येथेच करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ठाकरे परिवार अस्थी विसर्जनासाठी पवनी येथील वैनगंगा नदीपात्रावर आले. विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात आंघोळीसाठी प्रशांत पोहत खोल पाण्यात गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिथेच बुडाला.

ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिक धावून आले. नावाड्याच्या मदतीने त्याचा शोध घेतला. बराच वेळानंतर त्याचा मृतदेह गवसला. या घटनेची माहिती पवनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलीस नायक संतोष चव्हाण करीत आहे.

अर्ध्यावरती डाव मोडला

मृतक प्रशांत ठाकरे याचे फेब्रुवारी २०२२ला लग्न झाले होते. त्याची पत्नी आता गरोदर आहे. अशातच प्रशांतचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूriverनदी