शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील एडेड हायस्कूलमध्ये ९० वर्षापासूनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे  होणार महासंमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 15:09 IST

बुलडाणा : एडेड हायस्कूल ही शाळा बुलडाण्यात १९२७ पासून कार्यरत असून २०१८ पर्यंत शाळेला ९० वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन  डिसेंबरमध्ये येणार आहे.

ठळक मुद्देसंमेलनाचा उद्देश समाजाच्या विविध स्तरांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे आहे. सैल झालेली मैत्री पुन्हा मजबुत व्हावी, यासाठी २२ व २३ डिसेंबरला महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ४६ बॅच मधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांसोबत संपर्क झाला असून अजून ४४ बॅच विद्यार्थ्यांसोबत संपर्क होणे बाकी आहे.

बुलडाणा : एडेड हायस्कूल ही शाळा बुलडाण्यात १९२७ पासून कार्यरत असून २०१८ पर्यंत शाळेला ९० वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन  डिसेंबरमध्ये येणार आहे. संमेलनाचा उद्देश समाजाच्या विविध स्तरांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे आहे. जून्या स्मृती जागृत करणे आणि त्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी संपर्क व्यासपीठ तयार करणे हा आहे. तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शन, बेरोजगारी दूर करून उद्योगधंदा मिळावा आपुलकीचे स्नेहाचे नाते वृद्धींगत व्हावे, असा  आहे, अशी माहिती शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत देशपांडे (नागपूर) यांनी एडेड हायस्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, प्राचार्य आर. ओ. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक सदानंद काणे (यवतमाळ), माजी विद्यार्थी कमलेश कोठारी, आनंद संचेती, शिक्षक रघुनाथ देशपांडे, अंजली परांजपे उपस्थित होते. याप्रसंगी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले, आजपर्यत शाळेत दरवर्षी माजी विद्यार्थी त्या-त्या बॅच च्या विद्यार्थ्याचे स्नेहमिलन आयोजित करत आले आहेत. पण त्यात केवळ एकाच बॅच मधील विद्यार्थी भाग घेतात. या महासंमेलनाद्वारे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आणून त्यांच्यात संवाद निर्माण करून दिला तर त्याचा उपयोग सर्वाना होईल. आयुष्याच्या धावपळीत जूने दिवस पुन्हा संगळ्यांना जगता यावे. आणि त्या माध्यमातून इतक्या वर्षात सैल झालेली मैत्री पुन्हा मजबुत व्हावी, यासाठी २२ व २३ डिसेंबरला महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यत या साठी ४६ बॅच मधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांसोबत संपर्क झाला असून अजून ४४ बॅच विद्यार्थ्यांसोबत संपर्क होणे बाकी आहे. ज्या माजी विद्यार्थ्यांना या संमेलनात यायचे आहे, त्यांनी कमलेश कोठारी, श्रीकांत देशपांडे, आणि आनंद संचेती यांच्याशी संपर्क साधावा, या संमेलनामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. कॅप्शन : पत्रकार परिषदेत माहिती देतांना एडेडचे माजी विद्यार्थी श्रीकांत देशपांडे, डॉ. प्रमोद देशपांडे, प्राचार्य आर. ओ. पाटील

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी