ग्रामसेविकेला डांबले !

By Admin | Updated: August 22, 2015 00:56 IST2015-08-22T00:56:20+5:302015-08-22T00:56:20+5:30

ग्रामसभा सुरु असताना एका ग्रामस्थाने ग्रामसेविकेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत त्यांना ....

Gramsevikala stampede! | ग्रामसेविकेला डांबले !

ग्रामसेविकेला डांबले !

बोरगाव येथील प्रकार : अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
भंडारा : ग्रामसभा सुरु असताना एका ग्रामस्थाने ग्रामसेविकेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लाखनी तालुक्यातील बोरगाव येथे घडला. याप्रकरणी ग्रामसेवक संघटनेने काळया फिती लावून निषेध केला.
लाखनी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामसेविका एल. बी. जनबंधू व सरपंचांच्या उपस्थितीत सुरु होती. दरम्यान ग्रामस्थ देवानंद उके हे ग्रामसभेत आले. यावेळी त्यांनी ग्रामसेविका जनबंधू यांना अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता त्याने त्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरपंचासह उपस्थित ग्रामस्थांनी समयसुचकता दाखविल्याने अनर्थ टळला. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकाराने ग्रामसेविका चांगलीच धास्तावली. याची तक्रार खंड विकास अधिकारी कार्यालयाला केली. मात्र, कार्यालयाकडून कुठलिही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. याप्रकरणी ग्रामसेविका जनबंधू यांनी देवानंद उके यांच्याविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून उकेला अटक केली. मात्र, या प्रकारामुळे ग्रामसेवकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून भविष्यात उके यांच्याकडून सूड भावनेतून पाऊल उचलण्याची भीती वर्तविली आहे. ग्रामसभेला पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, अशा प्रकारावर आळा बसावा यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे निवेदन खंडविकास अधिकाऱ्याांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात जयंत गडपायले, नरेश शिवणकर, जहिर पटेल, राहूल ठवकर आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gramsevikala stampede!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.