ग्रामसेवक करणार राज्यभर आंदोलन
By Admin | Updated: August 9, 2016 00:38 IST2016-08-09T00:38:34+5:302016-08-09T00:38:34+5:30
जिल्हा परिषद भंडारा समोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने अंशदायी पेंशन योजनेचा ...

ग्रामसेवक करणार राज्यभर आंदोलन
प्रशांत जामोदे यांचा इशारा : मागण्यांविषयी ग्रामसेवक संघटना झाली आक्रमक
भंडारा : जिल्हा परिषद भंडारा समोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने अंशदायी पेंशन योजनेचा हिशेब मिळेस्तोवर जिल्हा परिषदेच्या विरोधात २१ जुलैपासून असहकार आंदोलन सुरु आहे. जिल्हा परिषद भंडारा येथे सन २०१४ पासून डीसीपीएस धारक ग्रामसेवक संवर्गाचे कपात केलेल्या सीपीएफच्या रक्कमेचा हिशेब नाही. त्यामुळे आंदोलन पुकारण्यात आले. मागणी पुर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केले.
ग्रामसेवकांच्या समस्यांविषयी आढावा घेण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉ. केदार उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे विभागीय सचिव विलास खोब्रागडे यांनी मय्यत ग्रामसेवकांच्या विधवांना अजुनपर्यंत अंशदायी पेंशन योजनेचा व निवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. भंडारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा अंशदायी पेंशनचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहील असे सांगितले.
उपरोक्त प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाशी वेळोवेळी झालेल्या चर्चा होऊन ही अंशदायी पेंशन योजनेअंतर्गत हिशेब न मिळाल्यामुळे ग्रामसेवक संवर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सन २००४ पासुन रुजू झालेल्या ग्रामसेवकांचे वेतनातुन कपात केलेली वर्गणी सिपीएफच्या खात्यात जमा करण्यात आली किंवा कसे? याबाबत अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
२१ जुलै २०१६ पासून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सर्व सभांवर बहिष्कार व अहवाल न देणे, असे आंदोलन सुरु होते. आंदोलनाचा पहिल्या टप्पा संपल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीही समाधानकारक कार्यवाही झालेली नाही. म्हणुन १ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागणी पूर्ण न झाल्यामुळे १० आॅगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन पंचायत समिती स्तरवर धरणे आंदोलन करण्यात येईल. २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. चाब्या गटविकास अधिकारी यांचेकडे जमा करुन सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यत पंचायत समिती स्तरावर धरणे आंदोलन सुरु राहील. २३ आॅगस्ट रोजी निषेध मोर्चा काढण्यात येईल.
आंदोलन महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी महासंघाचे नेते अतुल वर्मा यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजिपाले, विभागीय सचिव विलास खोब्रागडे, अनिल कोहळे, बबनराव कोल्हे, प्रमोद तिडके, राजु महंत, श्याम बिलवणे, विवेक धरणे, एम. सी. खांडाळकर, ए. जी. सौदागर, एम. एस. शेंडे, रमेश झोडे, प्रभाकर रामटेके, यु. के. पाटे, अमित चुटे, मंगला डहारे, यामिनी धुळसे, पी. आर. रामटेके, दिगांबर गभणे, सतिश गिते, दत्ता जाधव, तुळशिदास कोरे, झोडे, जे. एन. वेदी, अनिल धमगाये, एन. सी. बिसेन, प्रदिप लांजेवार, किशोर लेंडे, जयंत गडपायले, नरेश शिवणकर, झेड. एफ. बडवाईक आदी सहभागी झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)