ग्रामसेवक बेमुदत संपावर
By Admin | Updated: July 3, 2014 23:24 IST2014-07-03T23:24:38+5:302014-07-03T23:24:38+5:30
जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दि.२ जुलैपासून धरणे आंदोलनात बेमुदत बसलेले आहेत. ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्न शासन दरबारी वारंवारी मांडूनही सुटले नाहीत.

ग्रामसेवक बेमुदत संपावर
भंडारा : जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दि.२ जुलैपासून धरणे आंदोलनात बेमुदत बसलेले आहेत.
ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्न शासन दरबारी वारंवारी मांडूनही सुटले नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गात तीव्रपणे असंतोष पसरविला आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रृटी दूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरणेबाबत, २० ग्रामपंचायती मागे १ विस्तार अधिकारी पद निर्माण करणे प्रवास भत्ता पगारासोबत तीन हजार रूपये करणे, सर्व संवर्गाकरीता बदलीचे धोरण एक ठेवणे, आदी मागण्याकरीता शासनाचे लक्ष वेधण्याकरीता ग्रामसेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी ३० जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन केले होते.
मागण्यामध्ये २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन व ग्रामपंचायतीच्या चाब्या व शिक्के पंचायत समितीला जमा करण्यात आल्या. १० जुलैपर्यंत ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास दि.११ जुलैला आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे. बेमुदत धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, श्याम बिलवणे, आर.डी. महंत, विलास खोब्रागडे, पंकज काटेखाये, यामिनी धुळसे, मनोज वरूडकर, लालचंद मेश्राम, डी.डी. सार्वे, एफ.झेड. बडवाईक, अंजु सोनटक्के, सुधाकर गायधने, संदीप फुंडे, अनिल वाघमारे यांचेसह अनेक ग्रामसेवक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)