जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियान उत्साहात
By Admin | Updated: October 11, 2014 23:00 IST2014-10-11T23:00:08+5:302014-10-11T23:00:08+5:30
ठिकठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लाखनी : तालुक्यातील जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयात स्वच्छ भारत

जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियान उत्साहात
भंडारा : ठिकठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लाखनी : तालुक्यातील जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयात स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची गावात रॅली काढण्यात आली. साफसफाईसाठी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी राजश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना पुडके उपस्थित होते. अतिथी म्हणून सरपंच वैशाली बुरडे, मामा फटे, मुख्याध्यापक आर.बी. गडपायले, ग्रामसेवक टिचकुले, ग्रामपंचायत सदस्य रेखा गडपायले, अलका लांबकाने उपस्थित होते.
तुमसर : तालुक्यातील आलेसुर ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियानाचा मिशन लक्ष केंद्रीत करून माझे गाव स्वच्छ गाव व मतदान जागृतीची ग्रामसभेत सामूहिक शपथविधी कार्यक्रम घेतला. तांडावस्ती, मुख्य चौक, पाडावस्ती व मुख्य मार्गावर ग्रामसफाई करण्यात आली.
साकोली : सेंदुरवाफा येथे लक्ष्मीनारायण विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचयत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रमास्वच्छता कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळकरी मुलांच्या बँडपथकाने विद्यार्थ्यांच्या रॅलीचे नेतृत्व केले.
वाजतगाजत विद्यार्थ्यांची रॅली गावातून काढण्यात आली. स्वच्छतेची जाणीव आणि मतदानाच्या नैतिक जबाबदारीची जाणीव रॅलीच्या माध्यमातून गावकऱ्यांना झाली. याप्रसंगी सरपंच वसंता तुमळाम, अशोक ब्राम्हणकर, केशव निपाने, संतोष बोरकर, पोलीस पाटील अरविंद निंबेकर, रवी कापगते, मुख्याध्यापक पी.डी. मुंगमोडे, नरेश देशमुख, वसंता खुणे, प्रकाश पटले, ए.एम. बनकर, गेडाम, मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. रॅलीदरम्यान ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी ग्रामसफाई केली.
पहेला : स्थानिक गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. अध्यक्षस्थानी अॅड. आनंद जिभकाटे हे होते. प्रमुख अतिथीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य एस.डब्ल्यु थेरे, पर्यवेक्षक एस.के. गजभिये, संजिवनी जिभकाटे, जेष्ठ अध्यापिका आर. जे. वाघमारे उपस्थित होते. संचालन प्रा. व्ही.एल. हटवार यांनी केले. आभार गोंडाने यांनी मानले. (वार्ताहरांकडून)