शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

ग्रामपंचायत उचलणार शिष्यवृत्ती चाचणी परीक्षेचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परंतु जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अतिशय कमी आहे. निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक चाचणी परीक्षा सराव परीक्षा घेऊन विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसीईओंचे निर्देश, ग्रामनिधीतून शिक्षण या सदरावर होणार खर्च, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचा प्रयत्न

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आता ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा आधार घेतला जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. एका अर्थाने शिष्यवृत्ती चाचणी परीक्षांचा भार ग्रामपंचायती उचलणार आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. परंतु जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अतिशय कमी आहे. निकालाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक चाचणी परीक्षा सराव परीक्षा घेऊन विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. यासाठी निधीची गरज असते. परंतु सदर उपक्रमासाठी शाळांकडे निधीचा स्त्रोतच नाही. परिणामी विविध उपक्रम राबविले जात नाही आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या निकालाचा टक्काही वाढत नाही.आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून शाळांना पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. या पत्रावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी पी.एन. करणकोटे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र शाळांना पाठविले आहेत. तालुक्यात कोणत्या शाळेला किती निधी प्राप्त झाला याची एकत्रित माहिती कार्यालयाला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.ग्रामीण भागातील शाळांमध्ये निधी उपलब्ध नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा सराव होऊ शकत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहत नाही. ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेत पुढे यावा यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी निधी उपलब्ध करून दिला.-प्रकाश करणकोटे, शिक्षणाधिकारीग्रामनिधीचा उपयोगमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ५७ नुसार ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची स्थापना केली आहे. अनुसूची १ मधील क्रमांक १७ ते २१ मध्ये शिक्षण संबंधित कामांसाठी तरतूद आहे. ही कामे करण्याचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य कलम ४५ मध्ये दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणीच्या अनुषंगाने ग्रामनिधीमधून ग्रामपंचायतीच्या अधिनस्थ जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करून देण्याचे निर्देश आहेत. हा निधी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीस हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही वाढेल. या आदेशामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीgram panchayatग्राम पंचायत