आयपीपीईद्वारे ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण
By Admin | Updated: October 1, 2015 00:48 IST2015-10-01T00:48:05+5:302015-10-01T00:48:05+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आयपीपीई-२ चे पंचायत समिती भंडाराद्वारे बीपीटी पथकाचे ..

आयपीपीईद्वारे ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण
बीपीटी प्रशिक्षण : कोथुर्णा,सोनुली,सिरसी,इंदुरखा ग्रामपंचायतींचे पथकांकडून प्रात्यक्षिक
जवाहरनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आयपीपीई-२ चे पंचायत समिती भंडाराद्वारे बीपीटी पथकाचे पाच दिवसीय प्रशिक्षण ग्रामपंचायत गणेशपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पंचायत समिती सदस्य अस्मिता चव्हाण, प्रमिला लांजेवार, मंजुषा जगनाडे, वर्षा साकुरे उपस्थित होते.
यात प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक कृषी सेवक, तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, मग्रारोहयोमध्ये काम करणाऱ्या गतवर्षी १०० दिवस पुर्ण करणारे कुटूंबातील सुशिक्षित मजुर, एस.सी. एस.टी. कुटूंबातील नोंदकृत सुशिक्षित मजुर व महिला बचत गटामधील महिला प्रतिनिधी यांचा समावेश होता.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर, नायब तहसिलदार सी.टी. तेलंग, विस्तार अधिकारी (पंचायत) प्रमोद हुमणे, शाखा अभियंता यु.एच. ढेंगे एन.आर.एल.एम.चे तालुका समन्वयक प्रशांत बिलवणे हे होते. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्याचे सन २०१६-१७ चे वार्षिक नियोजन, एन.आर.एल.एम. सर्वेक्षण, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थीचे सर्वेक्षण, मग्रारोहयो अंतर्गत १०० दिवस काम पूर्ण करणाऱ्या कुटूंबातील १८ ते ३५ वयोगटातील प्रत्येक पात्र युवक युवतीसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय, कौशल्य वृद्धी योजने सर्वेक्षण, राष्ट्रीय सामाजिक अर्थसाह्य योजना कुटुंबाचे सर्वेक्षण याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यासंबंधी प्रात्यक्षिक म्हणून तालुक्यातील कोथुर्णा, सोनुली, सिरसी, इंदुरखा या ग्रामपंचायतीचे आयपीपीई-२ अंतर्गत बीपीटी, पथकाकडून निवडक सर्वेक्षण करण्यात आले. प्रास्ताविक मंजुषा ठवकर यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले यांनी केले. यशस्वीतेसाठी सहायक कार्यक्रम अधिकारी कार्तिक नंदेश्वर, स्थापत्य अभियांत्रिक सहायक डी.एच. चहांदे, प्रविण भिवगडे, गणेश कांबळे, गजानन भजे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)