ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संघटित व्हावे
By Admin | Updated: May 7, 2015 00:23 IST2015-05-07T00:23:51+5:302015-05-07T00:23:51+5:30
घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकांनी कार्य करण्याची गरज आहे. ग्राम विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संघटित व्हावे
सुधाकर आडे यांचे प्रतिपादन : वैयक्तिक शौचालयाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण
भंडारा : घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकांनी कार्य करण्याची गरज आहे. ग्राम विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक नागरिक जोपर्यंत प्रत्येक कामात सहभागी होणार नही तोपर्यंत कार्याला गती मिळणार नाही. त्यामुळे ग्रामविकासासाठी सचिव व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संघटीत होऊन कार्य करावे, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, गट समन्वयक, समूह समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे, गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी देशकर, साधनव्यक्ती नाना कुंदावार, कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे व जिल्हा कक्षाचे इतर सल्लागार उपस्थित होते. याप्रसंगी वैयक्तीक शौचालय बांधकामाकरिता अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शौचालय बांधकाम व वापर करण्याकरिता नागरिकांची मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी आहे. यासाठी ध्येय, धोरण, विचार स्पष्ट करावे लागेल. जोपर्यंत सचिव सर्वगुण संपन्न होणार नाही तोपर्यंत गावविकास होणार नाही. याकरिता सचिव व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपापसात मधुर संबंध तयार करून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन केले. कौशल्याच् या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन सारख्या कार्यक्रमाला यश्सवी करणे कठीण जाणार नसल्याचे सांगितले. सरपंच माधुरी देशकर यांनी सरपंच पदाबाबतच्या ग्रामविकासातील अनुभव कथन करून सचिव व पदाधिकारी यांच्यातील समन्वयावर भर दिला. गावविकासात महत्वाची भूमिका ही सचिवांची असते. त्यांच्या कार्याला पदाधिकाऱ्यांनी सहमती दिली तर गावविकास करणे कठीण जाणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रम व्यवस्थापक बिसेन यांनी सन २०१५-१६ आराखड्यामधील ग्रामपंचायतीतील वैयक्तिक शौचालय बाबतची माहिती सादर केली. शौचालयाचे बांधकाम, वापर आयईसी यासाठी बीआरसीसीआरसी यांची भूमिका विषद केली. तत्पूर्वी अंकुश गभणे यांनी राष्ट्रीय कार्यक्रम पेयजल कार्यक्रमाबाबतची माहिती व प्रपत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सचिवांनी सन २०१५-१६ च्या आराखड्यातील ग्राम पंचायतीमधील वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाबाबत नियोजन सादर केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)