ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:22 IST2017-06-06T00:22:34+5:302017-06-06T00:22:34+5:30

तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांच्यावर वैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला.

Gram panchayat member on strike | ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला

ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांच्यावर वैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे.
मुरमाडी, रामपुरी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी केलेल्या अफरातफर प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांनी विभागीय आयुक्त व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. विभागीय चौकशीअंती त्यांना निलंबित करण्यात आले होते. याचा वचपा काढण्यासाठी सोमवारला दुपारी ४.३० च्या सुमारास दत्ता पोहरकर यांनी सुनील चाफले यांना लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार मारहाण केली. यात सुनील चाफले गंभीररित्या जखमी झाले. त्यांना भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत दत्ता पोहरकर यांना अटक करण्यात झाली नव्हती. याप्रकरणाचा विविध संघटनांनी निषेध नोंदविला असून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Gram panchayat member on strike