ग्राम पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
By Admin | Updated: February 25, 2015 00:56 IST2015-02-25T00:56:07+5:302015-02-25T00:56:07+5:30
प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्राम पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
तुमसर : प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापावेतो लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही.
भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) प्रणीत तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संघटनेचे सहसचिव रामलाल बिसेन यांच्या नेतृत्वात सुमारे ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी तुमसर पंचायत समिती समोर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता साखळी उपोषण सुरु केले. यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन राहनीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची थकबाकी देणे, कर्मचारी भरतीत भेदभाव न करता जाहीरात देऊन भरती करणे, कर्मचाऱ्यांचा निधी इतरत्र खर्च न करता तो राखीव ठेवणे, रोजंदारी कर्मचाऱ्याला नियमीत करावे, जिथे ग्रामपंचायतीत पदभरती केली नाही तिथे शासनाचा निधी पाठविण्यात आला तो चुकीचा आहे.
कर्मचारी पदभरती पूर्व परवानगीने करावी, लिपिकाचे पद जाहीरात देऊन भरणे, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. खंडविकास अधिकारी रजेवर गेल्या होत्या त्यामूळे उपोषणकर्त्यांची कुणीच दखल घेतली नाही. मंगळवारी खंडविकास अधिकारी रूजू झाल्या. मंगळवारीच पंचायत समितीचीस ची आमसभा होती. आमदार चरण वाघमारे आमसभा संपल्यानंतर भेट देणार असल्याची माहीती आहे.
तालुक्यातील मिटेवानी ग्राम पंचायतीच्या च्या दोन कर्मचाऱ्यांचे सन २०१० पासून भविष्य निर्वाह निधी वेतनातून कपात करण्यात आले, परंतु त्यांच्या खात्यात अद्याप जमा झाला नाही, हे येथे उल्लेखनीय. हा निधी गेला कुठे याची चौकशीची मागणी संघटनेने केली आहे. तथा दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)