शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गरजूंना धान्य वितरण आणि बेघरांची वसतिगृहात सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ठिकठिकाणी अडकलेल्या जिल्ह्यातील गरीब व मजुरांची माहिती नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये. कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये, यासाठी प्रशासनाने गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा सुरू केला आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या बेघरांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था वसतीगृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गोरगरीबापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. भंडारा शहरात उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध ठिकाणी धान्याचे पॅकेट वाटप केले जात आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने लाखांदूर तालुक्यातील गरजू व मजुरांसाठी एक क्विंटल तांदूळ देण्यात आले आहे.शहरात असलेल्या बेघर व भिकाऱ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय वसतीगृहात करण्यात आली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग प्रमाणे राहण्याची सोय असणार आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अशा बेघर भिकाऱ्यांचे सर्व्हेक्षण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांना त्याठिकाणी हलविले जात आहे.शिवभोजन केंद्र सुरूकोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाच्या शक्यतेने येथील जिल्हा परिषद उपहारगृहात असलेले शिवभोजन केंद्र बंद करण्यात आले होेते. मात्र शनिवारपासून सदर केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शनिवारी केंद्र सुरू झाले. याठिकाणी सुद्धा सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येणार आहे. या केंद्राची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदीप काठोळे यांच्याकडे देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात भोजन मिळावे, हा या मागचा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या असून त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.विविध समन्वय समित्याकोरोना उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी विविध समित्या गठित केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू पुरवठा व व्यवस्थापन सनियंत्रण समिती, जनजागृती समिती, संपर्क शोधक समिती, तालुकास्तरीय सनियंत्रण समिती, वैद्यकीय व आरोग्य विषयक वस्तू व सेवापुरवठा समन्वय समिती, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय समन्वय समिती, नागरिक भागातील व्यवस्थापन विषयक समिती गठित करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाºयाची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना या साथ रोगाचा एकजुटीने मुकाबला करू या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक