रस्त्यांसाठी ग्रा.पं.चा पुढाकार

By Admin | Updated: August 28, 2014 23:36 IST2014-08-28T23:36:37+5:302014-08-28T23:36:37+5:30

मोहाडी (खापा) गावात असलेला विकासाचा अनुशेष शून्यावर आलेला आहे. या गावाला जोडणाऱ्या सोंड्या रस्त्यासाठी ४० लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती सरपंच विमल अंबादास कानतोडे

G.P. initiative for roads | रस्त्यांसाठी ग्रा.पं.चा पुढाकार

रस्त्यांसाठी ग्रा.पं.चा पुढाकार

चुल्हाड (सिहोरा) : मोहाडी (खापा) गावात असलेला विकासाचा अनुशेष शून्यावर आलेला आहे. या गावाला जोडणाऱ्या सोंड्या रस्त्यासाठी ४० लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती सरपंच विमल अंबादास कानतोडे यांनी लोकमतला दिली आहे.
दोन हजार लोकवस्तीच्या मोहाडी (खापा) गावात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आलेल्या आहेत. गावात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी १४०० मिटरपर्यंत सिमेंट रस्त्याचे जाळे विणण्यात आली आहे.
सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजनबद्धरित्या नाल्या आणि गटारे बांधकाम करण्यात आलेली आहेत. हे गटारे स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. गावात असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढताना यश आले आहे. नळ योजना गावकऱ्यांना पाणी पुरवठा करीत आहे. यंदा गावात ३०० मजुरांना रोहयो अंतर्गत रोजगार देण्यात आलेला आहे. गावात पांदण रस्ते, नाला सरळीकरण करण्यात आली आहेत. १४ लक्ष ची मजुरी जॉब कार्ड धारक मजुरांना वाटप करण्यात आले आहे. गावात आयोजित होणाऱ्या ग्रामसभा नियोजित आहेत. गावात घरकुलांचा अनुशेष आहे. गरजू लाभार्थी वंचित आहेत. ९४ लाभार्थी घरकुलांच्या प्रतिक्षेत आहे. या लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर करण्यात आली आहे .गावाला जोडणारी रस्ते डांबरीकरणासाठी ७० लक्ष मंजूर झाली आहेत. अंगणवाडी इमारत बांधकाला हिरवी झेंडी मिळाली आहे. या गावात ग्रामपंचायत इमारती जीर्ण झाली आहे. इमारत मंजुरीकरिता शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या गावाच्या विकासात महावितरणचे खांब अडसर ठरत आहेत. चांदपूर देवस्थानात जाणारा प्रमुख मार्ग याच गावातून आहे. रस्त्यावर विजेची खांब आहेत. हे खांब वाहतुकीला धोक्याचे ठरत आहेत. खांबामुळे अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर वाहतुकीच्या आवागमनात वाढ झाली आहे. संबंधित विभागांनी ही समस्या निकाली काढण्यात यावी, अशी मागणी सरपंच विमल कानतोडे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: G.P. initiative for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.