शासन लवकरच व्यापारी हिताचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:00 AM2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:50+5:30

काेराेनाचा नवा स्ट्रेन अधिक धाेकादायक असून, त्याची संक्रमणशक्ती तुलनेने जास्त आहे. याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत काेराेना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काेराेनाची ही साखळी ताेडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश दिले. खाजगी रुग्णालयातील काेविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंगळवारपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांमध्ये असंताेष दिसत आहे.

The government will soon take a decision in the interest of traders | शासन लवकरच व्यापारी हिताचा निर्णय घेणार

शासन लवकरच व्यापारी हिताचा निर्णय घेणार

Next
ठळक मुद्देविश्वजित कदम : काेराेना आढावा बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘ब्रेक द चेन’मुळे व्यापार, उद्याेगात नाराजीचा सूर उमटत आहे. एक- दाेन दिवसांत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय हाेणार आहे. काेराेना साखळी ताेडण्यासाठी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी येथे दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयाेजित काेविड आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. 
यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भाेंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके उपस्थित हाेते. काेराेनाचा नवा स्ट्रेन अधिक धाेकादायक असून, त्याची संक्रमणशक्ती तुलनेने जास्त आहे. याच कारणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत काेराेना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काेराेनाची ही साखळी ताेडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश दिले. खाजगी रुग्णालयातील काेविड उपचाराचे दर नियंत्रणात ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंगळवारपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांमध्ये असंताेष दिसत आहे. याबाबत बाेलताना पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम म्हणाले, उद्याेग, व्यापाऱ्यांबाबत एक- दाेन दिवसांत शासनस्तरावर सकारात्म्क निर्णय हाेणार आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
रेमडेसिवीरचा काळाबाजार राेखण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. औषधी दुकानात वाजवीपेक्षा अधिक दराने रेमडेसिवीर विकले जात असून, आवश्यकता नसताना प्रिस्क्राइब केले जात असल्याची बाब खासदार सुनील मेंढे व आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी या बैठकीत उपस्थित केली हाेती. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे निर्देश दिले.

लस उपलब्ध हाेणार
भंडारा जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला असून, जिल्हा सध्या अग्रस्थानी आहे. एक- दाेन दिवस पुरेल एवढेच डाेस शिल्लक असले तरी जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेईल, अशी ग्वाही पालकमंत्री डाॅ. कदम यांनी दिली. याबाबत आपण आराेग्यमंत्री व विभागीय आयुक्तांशी बाेललाे असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांनी कुठलीही शंका न घेता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बेड व ऑक्सिजन उपलब्ध
भंडारा येथे आयसीयू व ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयात अतिरिक्त १४० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयातही बेड निर्माण करण्यात आले आहेत. साेबत काेविड केअर सेंटरमध्येही बेड उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या बैठकीत दिली. काेविड केअर सेंटरमध्ये भाेजनाची उत्तम व्यवस्था असावी याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी सामान्य रुग्णालयातील काेविड लसीकरण केंद्राला भेट दिली.

 

Web Title: The government will soon take a decision in the interest of traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.