मुद्रांक विक्री बंद करण्याचा शासनस्तरावर डाव

By Admin | Updated: February 7, 2015 23:17 IST2015-02-07T23:17:51+5:302015-02-07T23:17:51+5:30

बनावट मुद्राकांना आळा घालण्याच्या नावाखाली चक्क मुद्रांक विक्रीच बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. २१ जानेवारीपासून हजार रुपये व त्यावरील किमतीचे न्यायीकेतर

Government on strike to stop stamp sale | मुद्रांक विक्री बंद करण्याचा शासनस्तरावर डाव

मुद्रांक विक्री बंद करण्याचा शासनस्तरावर डाव

भंडारा : बनावट मुद्राकांना आळा घालण्याच्या नावाखाली चक्क मुद्रांक विक्रीच बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. २१ जानेवारीपासून हजार रुपये व त्यावरील किमतीचे न्यायीकेतर मुद्रांकाची छपाई, वितरण व विक्री पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भिती आहे.
अपर मुद्रांक नियंत्रकांच्या २३ जानेवारीच्या पत्रानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक पुणे यांच्या संदर्भीय पत्राचा हवाला देत पुढील आदेशापर्यंत राज्यातील सर्व जिल्हा कोषागारे व सर्व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना एक हजार व त्यावरील अभिधानाच्या न्यायीकेतर मुद्रांक वितरण व विक्री तात्काळ थांबविण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. ई-चलान किंवा ईएसबीटीआर पद्धतीमुळे शासनाकडून मुद्रांक विक्रेत्यांना कोणतेही कमिशन द्यावे लागणार नसले तरी जनतेला मात्र आर्थिक भुदंर्डाला सामोरे जावे लागणार आहे. १०० ते ९०० च्या वर लागणारे मुद्रांक खरेदीसाठी जनतेला ई-चलान किंवा ईएसबीटीआर करण्यासाठी १०० ते २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. राज्यात विक्रेत्यांना मुद्रांक विक्रीची मर्यादा ३० हजार कमी केली नसली तरी एखाद्याला ३० हजाराचे मुद्रांक द्यावयाचे असल्यास ५०० रुपयांचे ६० नग घ्यावे लागतील. नोंदणी करताना प्रती नग २० रुपये प्रमाणे एक हजार २०० रुपये फी द्यावी लागेल. त्यानंतर झेरॉक्सचा खर्चही सोसावा लागेल.
राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते हे शासनमान्य असून, आगाऊ रकमेचा भरणा करून संबंधित कोषागारातून मुद्रांकाची उचल करतात. नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ते विकतात. मात्र त्यांनी कधीही बनावट मुद्रांक विकल्याचे प्रकरण घडले नाही. अशा स्थितीत शासनाने घेतलेला हा निर्णय मुद्रांक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कायदेशीर मागार्ने रोजगार मिळविणे प्रत्येकाचा अधिकार आहे. या अधिकाराने दिलेल्या मर्यादेपर्यत कोणत्याही किमतीचा न्यायीकेतर मुद्रांक विक्री करणे व त्यातून रोजगार मिळविणे आलेच. असे असताना शासनाने मुद्रांक विक्रेत्यांना बेरोजगार करण्याचा घाट घातला आहे. त्यांना ई-प्रणालीमधून रोजगार मिळवून द्यावा, असे भंडारा येथील मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Government on strike to stop stamp sale