हे तर शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे सरकार

By Admin | Updated: January 20, 2016 00:52 IST2016-01-20T00:52:33+5:302016-01-20T00:52:33+5:30

शेतकरी व बेरोजगार तरुणांचे कैवारी असल्याचा संभ्रम निर्माण करुन सतेत आलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी शेतकरी व बेरोजगारांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले आहेत.

This is a government sponsoring farmers | हे तर शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे सरकार

हे तर शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे सरकार

प्रफुल पटेल यांचा प्रहार : पवनी बाजार समितीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम
पवनी : शेतकरी व बेरोजगार तरुणांचे कैवारी असल्याचा संभ्रम निर्माण करुन सतेत आलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी शेतकरी व बेरोजगारांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे सिंचन प्रकल्प असो की शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न असो, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न असो हमी या सर्वच पातळीवर युतीचे सरकार असमर्थ ठरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार हे होते. यावेळी अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, शेतीनिष्ठ शेतकरी अशफाक पटेल, नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर उपस्थित होते.
यावेळी खासदार पटेल म्हणाले, भंडारा जिल्ह्यतील शेतकरी व शेतमजूर सुखी व्हावा ह्यासाठी गोसीखुर्द प्रकल्प उभारण्यात आला. त्या प्रकल्पासाठी व प्रकल्पग्रस्तांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य युपीए शासनाने केले. तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. काम सुध्दा जोमाने सुरु केले पंरतु सरकार बदलले युती शासनाने शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षीत बेरोजगार यांच्या विकास योजनांकडे पूर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शेतकरी व बेरोजगार तरुण हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे.
शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन व शेतीपुरक व्यवसायाचे मार्गदर्शन व मदत मिळाल्याशिवाय त्यांचा विकास होऊ शकत नाही.
शेतीला महत्त्व देऊन कार्य करणाऱ्या शेतकऱ्यााां यावेळी सत्कार करण्यात आला. कृषीभूषण नारायणराव भोगे, शामराव मेंगरे, दशरथ काटेखाये, विठ्ठलराव पंचभाई, शालीकराम भांडारकर, वनिता सावरबांधे, खुशाल राखडे व अन्य शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य यांनी केले. संचालन विलास काटेखाये यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अनिल धकाते यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: This is a government sponsoring farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.