शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

शासनाने उन्हाळी धानाची तात्काळ खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

चौरास भागात विहिरीच्या तसेच बोअरवेल पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. सध्या उन्हाळी धानाचे पिक निघणे सुरु झालेले आहे. तसेच यावर्षी वीज भारनियमन कमी व अपेक्षीत जलसिंचनामुळे उन्हाळी भाताचे क्षेत्रात वाढ झाले आहे. विहिरींची पाण्याची पातळी चांगली असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । महामंडळाचे झाले दुर्लक्ष, धान विक्रीची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने खरीप धान खरेदी केल्याप्रमाणे मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आधारभूत खरेदी केंद्र सुरु करुन उन्हाळी धानाची खरेदी लवकर करावी अशी मागणी चौरास परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.त्यामुळे उन्हाळी धानाचे क्षेत्र तुलनेने कमी असले तरी चांगल्या धान उत्पादनामुळे शेतकऱ्यांकडे आजही मोठ्या प्रमाणात घरी धानाचा साठा करुन ठेवले आहे.कोरोनाच्या परिस्थितीत धानाचे भाव वाढवून उन्हाळी धानाची खरेदी शासनाने त्वरीत करण्याची गरज आहे. बारीक धानाला १८०० ते २००० तर ठोकळ धानाला १२०० ते १४०० रुपये क्विंटल प्रामणे भाव मिळत असतो. यावर्षी बारीक धानाचे उत्पादन जास्त तर ठोकळ धानाचे उत्पादन फारच कमी आहे. उत्पादनाच्या मानाने लागवड खर्च अधीक आहे. त्यामुळे उन्हाळी धानाची खरेदी त्वरीत करावी अशी शेतकºयांची मागणी आहे.खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने तालुक्यात अनेक शेतकरी खरीपाच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी, वखरणी धुरे पेटविणे कामांना सुरुवात केली आहे. शेतकरी आपल्या शेतात मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असून खरीपासाठी बी बियाणे खरेदीची अनेक ठिकाणी लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात धान उत्पादनाचा फटका बसला होता. रबी हंगामातही गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने धान खरेदी केंदात वाढ करण्याची मागणी होत आहे.गोडाऊन झाले फुलजिल्ह्यात धानाचे लक्षणीय उत्पादन घेतले जात असताना शासनाकडून शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी विशेष उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप शेतकºयांतून होत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी धान खरेदीविना पडून आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी